शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट ५0 टक्के मालमत्ता कर वाढ!

By admin | Updated: September 5, 2016 00:50 IST

शेगाव नगर पालिकेद्वारे करण्यात आलेली १00 टक्के मालमत्ता कर वाढ माघे घेत ५0 टक्के करवाढ करण्यात आली.

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ४: नगरपालिकेने खासगी एजन्सीच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेच्या आधारावर मालमत्ता करात १00 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त करवाढ केली होती. त्यावर तीन दिवसांपासून सुनावणी घेत एसडीओ अपील समितीने सरसकट ५0 टक्के करवाढीचा निर्णय दिला.शेगाव नगरपालिकेने सन २0१३-१४ मध्ये खासगी एजन्सीला मालमत्ता कर वाढीकरिता सर्व्हे करण्याचा कंत्राट दिला होता. त्यानुसार झालेली मालमत्ता कर वाढ ही १00 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला होता. झालेली कर वाढ आकारणी ही मुळातच नियमबाह्य आणि अन्यायकारक असल्याची ओरड सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. त्यावर शेगाव संघर्ष समितीने आवाज उठविल्याने ४६00 नागरिकांनी आपल्या हरकती सन २0१५ मध्ये दाखल केल्या होत्या. मात्र त्यामध्ये फक्त १0 टक्केच करवाढ कमी करण्यात आल्याने नागरिकांनी त्यावर अपील दाखल केले होते. परंतु त्यानंतर दीड वर्ष उलटल्यानंतरही उपविभागीय महसूल अधिकारी यांनी वेळ न दिल्याने सुनावणी थंड बस्त्यात पडली होती. त्यानंतर अचानकच ऑगस्ट महिन्याच्या २३ तारखेपासून न.प.च्या २0१५ तारखेच्या अपील सुनावणीच्या नोटिसा २0१६ मध्ये नागरिकांना देऊन सुनावणीकरिता सप्टेंबर महिन्याच्या १, २, ३ अशा तारखा देण्यात आल्या आणि त्याठिकाणी नागरिकांच्या सुनावणी न घेता सह्या घेऊन रवानापूर्ती करण्यात आली. ३ सप्टेंबरला शेवटच्या दिवशी उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या नगर रचनाकारचे गिरीश आगरकर, नगराध्यक्ष शारदा कलोरे, महिला व बालकल्याण सभापती विरोधी पक्षनेता रुपाली शिंदे, दिनेश लहाने या समितीने निर्णय घेतला. या निर्णयानुसार अगोदर असलेल्या कर आकारणीवर सरसकट ५0 टक्के करवाढ करण्यात आली आणि ज्या २0१४ च्या नंतरच्या नवीन मालमत्ता आहेत, त्यांना फक्त ५ टक्के झालेल्या कर आकारणीमधून कमी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)तसेच खुल्या भूखंड मालमत्तेला करयोग्य मूल्याप्रमाणे कर लावण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. मालमत्तेच्या क्षेत्रात व बांधकामाचे वर्ष यामध्ये त्रुटी आढळल्यास ते दुरुस्तीचे अधिकार मुख्याधिकार्‍यांना असणार असल्याचा निर्णय या समितीने घेतला आहे.