शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत राहणाऱ्याला ४९ हजारांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 11:09 IST

49,000 electricity bill for slum dwellers : झोपडीत राहणाऱ्या ग्राहकाला महावितरणने चक्क ४९ हजार ४८० रुपयाचे देयक दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील चांदमारी भागात एका झोपडीत राहणाऱ्या ग्राहकाला महावितरणने चक्क ४९ हजार ४८० रुपयाचे देयक दिले. ग्राहकाने तक्रार करताच वीजबिल कमी करण्यात आले.वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील चांदमारी भागात चक्क झोपडी राहणाऱ्या एका ग्राहकाला भरमसाठ बिल देण्यात आल्याने वीज कंपनीचे पितळ  उघडे पडले आहे. चांदमारी भागातील गजानन उखर्डा मसतूद हे बकऱ्या चारतात. त्यांच्या घरात एक ट्यूबलाइट, एक टीव्ही आणि पंखा आहे. याव्यतिरिक्त कोणतीच विजेची उपकरणे ते वापरत नाहीत. तसेच त्यांचे  झोपडीवजा घर आहे. असे असताना त्यांना महावितरणने ४९ हजार ४८० रुपयाचे देयक दिले. एवढे बिल पाहून ते भांबावून गेले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता सुरूवातीला त्यांच्या वीज बिलाला पर्यायच नसल्याचे सांगण्यात आले. तर काही अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये भरा असा उरफाटा सल्ला दिला. त्यांना दर महिन्याला सहाशे ते सातशे रुपये बील येत होते. मजुरी करून ते विजबील भरत होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात ते वीजबिल भरू शकले नाही. त्यानंतर त्यांना मार्च महिन्यात अव्वाच्या सव्वा बिल देण्यात आले. 

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरण