शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

४५० गावं पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2017 02:12 IST

जिल्हा सांख्यिकी अहवाल : पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सुविधा नाही!

बुलडाणा : पाच वर्षांपासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश परिस्थितीच्या छायेत आहे. यामुळे शेतातील पिकांसह नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात १४४४ गावे असताना, यापैकी केवळ ९८९ गावांत पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा असून, उर्वरित ४५० गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याची बाब जिल्हा सांख्यिकी अहवालातून पुढे आली आहे.काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प झाले असून, शहरासह बऱ्याच ग्रामीण भागात पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. आजरोजी जिल्ह्यात २८७ गट ग्रामपंचायत व ५८० स्वतंत्र्य ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींमधून कार्यरत पाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील ९८९ गावांना पिण्याचे पाणी पुरविल्या जात आहे. शिवाय उपलब्ध पाण्यातून इतर गरजाही पूर्ण करण्यात येतात. मात्र, असे असतानाही बरेच गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत.जिल्हा सांख्यिकी अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण १४४४ गावांपैकी ९८९ गावांत पिण्याच्या पाण्याची उपाययोजना आहे, तर उर्वरित ४५० गावांत पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहीर, हातपंप, नदी आदी पाणी स्रोताचा पाण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे. आज पाणीटंचाईमुळे बऱ्याच गावांचे पाणी स्रोत प्रभावित झाले आहेत. अनेक गावांतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागातील स्थिती भयंकर असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार आहे. ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई यंदा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला, मात्र आॅक्टोबर २०१६ नंतर पावसाने पाठ फिरवली, शिवाय पाण्याचा वापरही वाढला. यामुळे उन्हाळा सुरु होण्याआधीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई निवारण आराखड्यानुसार जिल्ह्यात ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहे.चार गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट जाणवायला सुरुवात झाली असून, चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे यावर्षीही पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील चार गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये दे.राजा तालुक्यातील पाडळी शिंदे गावाचा समावेश आहे. तसेच खामगाव तालुक्यातील निरोड व शिराळा, सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी गावाचाही समावेश आहे. पाडळी शिंदे गावची लोकसंख्या २५०० असून, गावाकरिता २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेऱ्या मारणार आहे. निरोडच्या १७०९ लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेऱ्या मारणार आहे. त्याचप्रमाणे शिराळा येथील १६०९ लोकसंख्येकरिता याच क्षमतेचा एक टँकर तीन फेऱ्या दिवसातून मारणार आहे. तसेच सोनोशी येथील ३९०० लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन फेऱ्या मारणार आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देऊन टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. तसेच ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी, टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.