शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४.५० लाख अल्पभूधारकांचे १ हजार ४० कोटींचे पीक कर्ज माफ

By admin | Updated: June 13, 2017 00:19 IST

पेरणीसाठी शेतकऱ्यांना तत्काळ पैशांची गरज : बँकांचा नकार

विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५२ हजार ८७८ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे पीक कर्ज माफ होणार आहे. मात्र, अद्याप शासनाचे कोणतेही दिशानिर्देश आले नसल्यामुळे बँकेचे अधिकारी कर्जमाफी कशी द्यायची, याबाबत संभ्रमात आहेत. गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली, तर त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्राही काढली. संपूर्ण राज्यात विविध पक्षांच्यावतीने कर्जमाफीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शेतकरी संपावर गेले. या सर्वांची फलश्रुती कर्जमाफीत झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्याची घोषणा केली. जिल्ह्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ६३ हजार १३८ असून, यापैकी ४ लाख ५२ हजार ८७८ शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १५ हजार १०५ शेतकऱ्यांकडे १२९० कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी अत्यल्प भूधारक १ लाख १३ हजार ८४४ शेतकऱ्यांकडे ४३० कोटी, अल्पभूधारक ८२ हजार ४०३ शेतकऱ्यांकडे ६१० कोटी रुपये, तर अन्य २ लाख ८५८ शेतकऱ्यांकडे २४९ कोटींचे पीककर्ज आहे. शासनाने सध्या केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार २४७ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे १ हजार ४० कोटींचे कर्ज माफ होणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याच्या विचारात असून, सरसकट पीक कर्जमाफी झाली, तर २ लाख १७ हजार १०५ शेतकऱ्यांचे १२९० कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती असून, गत चार-पाच वर्षांपासून चांगले उत्पन्न झाले नाही. यावेळी उत्पन्न झाले, तर भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बँकांकडे रक्कम प्राप्त झाल्याशिवाय नवीन कर्ज नाही!कर्जमाफी झाल्यामुळे शेतकरी बँकांकडे नवीन पीक कर्जाची मागणी करीत आहेत. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांना परत पाठवित आहेत. जोपर्यंत शासन बँकांकडे शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाची रक्कम जमा करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार नाही. शासनाने केवळ रविवारी घोषणा केली असून, त्याबाबत अजून कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.बँकांना दिशा निर्देशाची वाट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली, तरी अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारचा अध्यादेश शासनाने काढला नाही. तसेच बँकांना कोणतेही दिशा निर्देशही दिले नाहीत. त्यामुळे कर्जमाफी कशी द्यायची, कुणाला द्यायची, याबाबत बँकेचे अधिकारी संभ्रमात आहेत. शेतकरी बँकेत जाऊन कर्जमाफीबाबत विचारपूस करीत आहेत. मात्र, अद्याप आदेश आले नसल्यामुळे अधिकारी आदेशाची वाट पाहत आहेत.