शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

बुलडाणा जिल्ह्यात ४३७ विद्यार्थ्यांंना हृदयविकार!

By admin | Updated: August 24, 2016 00:03 IST

राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाचा अहवाल: शाळा, अंगणवाडी व आश्रम शाळांमध्ये तपासणी.

विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. २३ : राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा, आश्रम शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात आली असून, यामध्ये ४३७ विद्यार्थी हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच ७८६ विद्यार्थी अन्य आजारांनी ग्रस्त असून, शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी शाळेचे सत्र सुरू झाल्यानंतर जून ते मार्चपर्यंंंत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात येते. सदर तपासनीकरिता पथक तयार करण्यात आले असून, यामध्ये डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यावर्षी जुलै महिन्यात केलेल्या विद्यार्थ्यांंंच्या आरोग्य तपासणीतच जिल्ह्यात ४३७ मुले हृदयविकारासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंंंत ३५ आश्रम शाळांमधील ९३९५ विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात आली. तसेच ३७१ शाळांमध्ये ४५ हजार ८९१ विद्यार्थ्यांंंची, २९0२ आंगणवाडींमधील १ लाख ७५ हजार ८२८ विद्यार्थ्यांंंची तपासनी करण्यात आली आहे. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ४३७ विद्यार्थ्यांंंपैकी १५९ विद्यार्थ्यांंंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर २३७ विद्यार्थ्यांंंंनी शासनाच्यामार्फत शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. ४१ विद्यार्थ्यांंंच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यासोबतच अन्य शस्त्रक्रियेस ७८६ विद्यार्थी शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. यापैकी ४६४ विद्यार्थ्यांंंंच्या शस्त्रक्रिया झाल्या असून, १९१ विद्यार्थ्यांंंंनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. १३१ शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. आरोग्य विभागात अनेक पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांंंंची आरोग्य तपासनी करण्यातही अडथळे निर्माण होत आहे. जिल्ह्यात ३३ चमू कार्यान्वीत बुलडाणा जिल्ह्यात शाळा, आंगणवाडी व आश्रमशाळांमध्ये जावून तपासनी करण्याकरिता एकूण ३३ चमूंची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १ चमू नगर पालिकेतील शाळांसाठी तर ३२ चमू ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांंंंची तपासनी करण्याकरिता नियुक्त करण्यात आली आहे. शासनाच्यावतीनेच करण्यात येते शस्त्रक्रिया शासनाने नेमणूक केलेली चमू शाळांमध्ये तपासनी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंंला कोणता आजार झाला, याची माहिती देते. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची ग्रामीण रूग्णालयात तपासनी करण्यात येते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणता आजार आहे व त्यावर उपचार किंवा शस्त्रक्रिया कोठे करावी, हे निश्‍चित करून त्यानुसार उपचार केले जातात. शाळा सुरू झाल्यापासून मार्च महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासनी करण्यात येते. त्यानुसार सध्या शाळांमध्ये चमू आरोग्य तपासनी करण्यात येत आहे. आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत.- डॉ. शिवाजी पवारजिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा