शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीमुळे ४0 जणांना विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:12 IST

पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना  महिनाभरात सुमारे ४0 जणांना विषबाधा झाल्याची माहिती  लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विनोद जाधव यांनी दिली. 

ठळक मुद्देलाखनवाडा परिसरात पिकांवरील फवारणी बनली जीवघेणीकृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लाखनवाडा : पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना  महिनाभरात सुमारे ४0 जणांना विषबाधा झाल्याची माहिती  लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विनोद जाधव यांनी दिली. गेल्या एक महिन्यात जवळपास ४0 लोकांना कीटकनाशक  फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी ५0 टक्के  रुग्णांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे हलविण्यात आले.  तर काही रुग्णांना जवळपास ४0 पर्यंत इंजेक्शन द्यावे  लागले. सध्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर  कीटकनाशकांची फवारणी शेतकरी मोठय़ा प्रमाणात करीत  आहेत; परंतु सदर कीटकनाशक फवारणी करताना अंगावर  औषध पडल्यामुळे फवारणी करणार्‍यांना विषबाधा होण्याचे  प्रमाण खूपच वाढले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर हे शे तकर्‍यांचे मुख्य पीक आहे. त्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव  होऊ नये, यासाठी महागडे औषध घेऊन शेतकरी पिकावर  फवारणी करतात; परंतु पीक वाचविण्याच्या नादात शे तकर्‍यांच्याच जीवाला धोका निर्माण होत आहे.यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे;  मात्र पिकावर कीटकनाशकाची फवारणी केल्याशिवाय पर्याय  नाही. अगोदरच अत्यल्प पावसामुळे पिकाचे नुकसान होत  आहे. काही शेतकरी कृषीपंपाद्वारे पाणी देऊन कसेबसे पीक  वाचवित आहेत.  त्यातच अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने  कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक बनलेले आहे;  परंतु कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होत असल्यामुळे  शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरजविविध पिकांवरील किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी  रासायनिक कीटकनाशके फवारत आहेत; परंतु कीड रोग  सहजासहजी आटोक्यात येत नसल्याने अधिकप्रभावी  कीटकनाशकांचा शोध शेतकर्‍यांकडून घेतला जातो. ही  कीटकनाशके पिकातील अन्नघटकांसोबतच फवारणी  करणारे शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवासाठीसुद्धा  धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे नेमके कोणते  कीटकनाशक कोणत्या पिकासाठी फवारावे, फवारणी कर ताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात कृषी विभागाच्या  अधिकारी व कर्मचार्‍यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

पिकावरील कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होत  आहे. त्याकरिता कीटकनाशकाची फवारणी करताना  तोंडाला रुमाल बांधून फवारणी करावी व हातात मोजे  घालावे जेणेकरून विषबाधा होण्यापासून बचाव होऊ  शकेल. - डॉ.विनोद जाधव,वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लाखनवाडा.