शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ३९५ शेततळी

By admin | Updated: January 26, 2016 02:28 IST

६७ शेततळय़ांचे काम पूर्ण; १९७ शेततळय़ांचे काम प्रगतिपथावर.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा: शेतीला उपयुक्त पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने जलस्रोत वाढविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३९५ शेततळी मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ६७ शेततळी पूर्ण झाली असून, १९७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. उर्वरित १३१ शेततळ्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे परिसरात असलेल्या गावांतील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून, आतापर्यंत १३७.२१ लाखांचा खर्च यावर करण्यात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पेरणीच्या सुरुवातीला पावसाने दगा दिला होता. त्यामुळे पेरणी वेळेवर न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट आली. यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकर्‍यांना शेततळी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीने किमान पाच शेततळी घेण्याचा सूचना दिल्या आहेत. १0 बाय १0 बाय ३ मीटर, १५ बाय १0 बाय ३ मीटर तसेच १५ बाय १५ बाय ३ मीटर या आकाराचे शेततळे ग्रामपंचायतमार्फत घेण्याची परवानगी शासननिर्णयानुसार देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायत अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षासाठी ३९५ शेततळी मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ६७ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, १९७ शेततळ्यांचे काम सुरू आहे. यासाठी आतापर्यंत १३७ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या शेततळ्यांमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.