शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

धरण क्षेत्रातील ३८ गावांना धोका!

By admin | Updated: July 7, 2016 02:45 IST

आपत्ती विभागाचा अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यातील २६0 प्रकल्पामुळे २३४ गावे प्रभावित होण्याची शक्यता.

बुलडाणा : अतवृष्टीमुळे धरणांची पातळी वाढून धरणामुळे जिल्ह्यातील धरणाखालील व धरणाजवळील गावांना धोका संभवून मोठय़ा प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती विभागाने २0१६ आपत्ती व्यवस्थापन अहवाल तयार केला असून, त्यानुसार धरण फुटल्यास धोका उद्भवणार्‍या ३८ गावांत सतर्कता ठेवण्यात आली आहे.पावसाला सुरुवात झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावे ही संभाव्य पूरबाधित आणि ३८ गावे धरणापासून संभाव्य धोका असणारी म्हणून निवडण्यात आली आहेत. त्यामुळे पुराच्या संभाव्य धोक्यामुळे या गावांमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक प्रभावित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना केल्या आहेत.जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प, सहा मध्यम प्रकल्प, ७६ लघू प्रकल्प आणि १७६ पाझर तलाव आहेत. २६0 एकूण प्रकल्प असून, जिल्ह्यातील मुख्य शहरांसह २३४ गावं व परिसरात पाणीपुरवठा व सिंचनाची सोय असलेले प्रकल्प होत. मात्र नागरिकांसाठी व पिकांसाठी जीवनदान देणारे हे प्रकल्प अतवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यासाठी धोकादायक ठरु शकतात.