शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ३८ शाळा पात्र

By admin | Updated: September 28, 2016 01:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातून अंतिम नोंदणी केलेल्या ७८७ शाळांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरल्याची माहिती.

गणेश मापारी खामगाव(जि. बुलडाणा), दि. २७- स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातून अंतिम नोंदणी केलेल्या ७८७ शाळांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारी शाळा, समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणारी शाळा तसेच आरोग्य व स्वच्छतेबाबत इतरांना प्रेरणा देणार्‍या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.स्वच्छता गृह, साबणाने हात धुणे, पाण्याची व्यवस्था, ऑपरेशन अँण्ड मेन्टनन्स आणि स्वच्छतेच्या सवयींची रुजवणूक यासाठी एकूण १00 गुण शाळा, विद्यालयांना देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध रंगानुसार शाळांचे गट तयार करण्यात आले आहेत. ३५ पेक्षा कमी गुण घेणार्‍या शाळांसाठी ह्यरेडह्ण गट असून, ३५ ते ५0 ह्यऑरेंजह्ण, ५१ ते ७४ ह्ययलोह्ण, ७५ ते ८९ ह्यब्ल्यूह्ण आणि ९0 ते १00 गुण मिळविणार्‍या शाळा ह्यग्रीनह्ण गटात टाकण्यात येणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते. बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या १ हजार ४५७ शाळांपैकी १ हजार १८३ शाळांनी नोंदणी केली होती; मात्र शाळांची सविस्तर माहिती देण्याच्या प्रक्रियेत ३८३ शाळा बाद झाल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जिल्हाभरातून केवळ ७८७ शाळाच राहिल्या. या ७८७ शाळांची तपासणी निरीक्षण समितीने केली असून, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरलेल्या आहेत. या ३८ शाळांपैकीही तीन शाळांनी काही निकषांची पूर्तता करणे अद्याप बाकी आहे. १७२ शाळा विषयनिहाय पुरस्कारासाठी पात्रस्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांसोबतच प्रत्येक मुद्यांवर चांगली कामगिरी करणार्‍या शाळांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. पाणी उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, विद्यार्थी वर्तवणूक बदल आणि वेगवेगळे शौचालय या मुद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानुसार वेगवेगळ्या विषयांवर चांगले काम करणार्‍या जिल्ह्यातील १७२ शाळा विषयनिहाय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. आलेख घसरताच स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये जिल्ह्यातील शाळांच्या सहभागाचा आलेख घसरताच असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५६३ शाळांपैकी १ हजार १७0 शाळांनी सर्वप्रथम ऑनलाइन नामांकन भरले. अंतिम नामांकनाच्या वेळी यामधील ३८३ शाळा कमी झाल्या. त्यामुळे ७८७ शाळांचाच सहभाग या अभियानामध्ये राहिला. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी आता केवळ ३८ शाळा पात्र झाल्या आहेत. यापैकीही काही शाळांची गळती होणार असून, राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किती शाळा अंतिम यादीत राहतील, याकडेच आता लक्ष लागले आहे.