शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

बुलडाणा जिल्हय़ातील ३८ गावात एचआयव्ही एड्समुक्तीचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:41 IST

एचआयव्ही एड्स या महाभयंकर रोगाचा संसर्ग रोखण्याकरिता  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले यांच्या  पुढाकारातून एचआयव्ही एड्समुक्त गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात ये त आहे. यासाठी शंभर गावांची निवड करण्यात  आली असून, आतापर्यंत ३८  गावात मोहीम राबवून ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचा विशेष उपक्रम  

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एचआयव्ही एड्स या महाभयंकर रोगाचा संसर्ग रोखण्याकरिता  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले यांच्या  पुढाकारातून एचआयव्ही एड्समुक्त गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात ये त आहे. यासाठी शंभर गावांची निवड करण्यात  आली असून, आतापर्यंत ३८  गावात मोहीम राबवून ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले आहे.जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्यावतीने एचआयव्ही एड्समुक्त गाव  मोहीम जुलै महिन्यापासून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या समु पदेशन व चाचणी (आयसीटीसी) केंद्रातील समुपदेशकांमार्फत राबविण्यात ये त असून, गावकर्‍यांमध्ये एचआयव्ही एड्समुक्तीचा जागर केला जात आहे.  एड्समुक्तीसाठी निवडलेल्या गावात नव्याने कुणाला एचआयव्ही संसर्ग होणार  नाही, याची काळजी घेण्याबाबत ग्रामस्थांचे समुपदेशन केले जात आहे.  एचआयव्ही एड्स कसा होतो, कशामुळे होतो, तो कसा टाळला जाऊ शकतो,  त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत माहिती समजावून सांगितली जात आहे.  युवा वर्ग, समलिंगी संबंध ठेवणार्‍या व्यक्ती, महिला मंडळ, बचतगट, युवा गट,  आशा स्वयंसेविका, सरकारी कर्मचारी यांच्यासह सर्वांचे समुपदेशन केले जात  आहे. २0२0 पर्यंत नव्याने कुणालाच या संसर्गाची लागण होणार नाही, याची  कटाक्षाने दक्षता घेण्यात येत आहे. या मोहिमेची सुरूवात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणाराजा येथून करण्यात  आली असून, आतापर्यंत ३८ गावात मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी  मोहीम राबविण्यात आलेल्या गावात प्रत्येक व्यक्तीची एचआयव्ही चाचणी  करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सरकारी कर्मचारी व अन्य लोक  सायंकाळी उशिरा घरी येत असल्यामुळे आयसीटीसीचे कर्मचारी रात्री आठ  वाजेपर्यंत थांबून सभा घेऊन जनजागृतीचे काम करीत आहेत. तपासणीदरम्यान  एखादा संसर्गित आढळल्यास त्याच्यावर नियमित उपचार करून इतरांना लागण  होऊ नये, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय  गावकर्‍यांच्या सहकार्यातून घोषवाक्यांनी भिंती रंगविणे, प्रभातफेरीचे उपक्रम  राबत आहे.

१८ आयसीटीसी केंद्राद्वारे समुपदेशनएड्समुक्तीचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक-समुपदेशन  संवाद कार्यक्रम आयसीटीसीमार्फत हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील १८  आयसीटीसी केंद्राच्या  समुपदेशकांनी एचआयव्ही एड्सबाबत शिक्षकांचे समु पदेशन केले आहे. शाळेत जाऊन समुपदेशक एक तास मार्गदर्शन करीत  असून, आतापर्यंत  जिल्ह्यातील आठशे शिक्षकांची एचआयव्ही चाचणी करून  त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यावेळी एकूण ३ हजार ४६0 व्यक्तींची  तपासणी करण्यात आली असून, एक व्यक्ती एचआयव्ही बाधित आढळून  आला आहे.

या गावात राबविण्यात आली मोहीमजिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाद्वारे एचआयव्ही एड्समुक्त गाव मोहीम  जिल्ह्यातील ३८ गावात राबविण्यात आली. त्यात रूईखेड, अंभोडा, पांगरी,  अजिसपूर, दहीद, कदमापूर, जयपूर लांडे, कंजारा, जानोरी, एकलारा,  बावनविर, मनुबाई, शेलापूर बु., डिडोळा, चांडाळवाडी, वाघोदा, फैजपूर,  नायगाव, मेहुणाराजा, सावखेड भोई, असोला, मांडवा, उमराअटाळी, आसा,  सातगाव, दुधा, भोसा, माळ सावरगाव, शिवणीटाका, उमरेड, डोड्रा,  नारायणखेड, चाळीसटापरी, गोमाळा,  भिंगारा, मराखेड, असलमपूर, दहीगाव  यांचा समावेश आहे.