शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीच्या ३७ टक्के पेरण्या!

By admin | Updated: November 18, 2014 23:57 IST

जीवनदान परतीच्या पावसामुळे शेतक-यांना फायदा.

ब्रह्मनंद जाधव / मेहकरराज्यात प्रदीर्घ दडीनंतर परतीचा पाऊस फिरकल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यात सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये गहू व हरभरा पिकाचा पेरा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. तर विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा शेतीला लागलेला खर्चही भरून निघला नाही. खरीप हंगामातील झळ रब्बीत भरून काढण्यासाठी ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांची रब्बी पिकाची कामे जोमात सुरू आहेत; परंतु, कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी ६२ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यातील सरासरी २३ लाख ९ हजार ९१0 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मक्याच्या सरासरी ९९ हजार ६00 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शाळूचे सरासरी क्षेत्र ३0 लाख ९0 हजार असून, ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. हरभरा १३ लाख ६ हजार ८00 हेक्टर क्षेत्र असून, ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाचे सरसरी क्षेत्र ११ लाख ७८ हजार ६00 असून, १0 टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. तर भाजीपाला, भुईमूग, सूर्यफूल, करडी, जवस, वाटाणा व इतर पिकांचे सरासरी ६ लाख ६७ हजार ६00 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २ लाख ७९ हजार ४३0 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्यासह इतर पेरणी झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे लांबलेला खरीप हंगाम व परतीच्या पावसाअभावी रब्बीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अनेक शेतकर्‍यांनी पेरणी करण्याचे धाडसच केले नव्हते; परंतु गत तीन ते चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी परतीचा पाऊस फिरकल्याणे शेतकर्‍यांमध्ये आता रब्बी हंगामाची आशा निर्माण झाली आहे. तर बहुतांश ठिकाणी या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला जोमात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.