शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीच्या ३५ हजार प्रकरणांमध्ये त्रुटी!

By admin | Updated: December 12, 2014 00:50 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्ताव जाती पडताळणी समितीने परत पाठविले; समाजकल्याण विभागाने झटकली जबाबदारी

सिद्धार्थ आराख / बुलडाणा अकोला येथील जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाठविलेले ३५ हजार प्रस्ताव समितीने परत पाठविले आहेत. यामध्ये काही समाजकल्याण कार्यालयाने पाठविलेले तर काही शाळांनी पाठविलेल्या प्रस्तावांचा समावेश आहे. समितीकडे प्रस्ताव दाखल करताना ते ऑनलाईन करूनच पाठवावे, असे स्पष्ट आदेश असताना समाजकल्याण विभागाने ऑनलाईन न करताच हे प्रस् ताव पाठविल्यामुळे त्याचा भुर्दंड आता जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पडणार आहे.दरवर्षी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी, तसेच कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या आणि विविध निवडणुकीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. हे जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी अकोला येथील जाती प्रमाण पत्र पडताळणी समितीकडे रितसर प्रस्ताव दाखल करावा लागतो. यापूर्वी हे प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयाकडे दाखल करावे लागत होते. समाजकल्याण कार्यालय या प्रस्तावाची स्क्रुटनी करून अकोला येथील समितीकडे दाखल करीत होते. त्यानंतर ही समिती प्रस्तावाची तपासणी करून संबंधित विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देत होते; मात्र मागील वर्षापासून प्रस्ताव शाळांनी ऑनलाईन करूनच पाठवावेत, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. तशा सूचना समाजकल्याण विभागाला दिल्या होत्या. तरीही समाजकल्याण विभागाने शैक्षणिक वर्ष २0१३-१४ च्या इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांनी दिलेले प्रस्ताव स्वीकारून समितीकडे जसेच्या तसे पाठविले. हे प्रस्ताव ऑनलाईन केलेले नाहीत, हे माहीत असताना समाजकल्याण विभागाने ते का स्वीकारले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. समितीने ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. मुदतीच्या आत नव्याने प्रस्ताव न गेल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.