खामगाव: येथील खामगाव जनता कर्मशियल को-ऑप. बँकेकडे अडकलेल्या आठ कोटी रुपयांच्या ठेवीपैकी तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या ठेवी परत घेण्यात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाला यश आले आहे. दरम्यान, उर्वरित पाच कोटी रुपयांच्या ठेवीही, मुदत संपल्यानंतर परत घेण्याच्या दिशेने संचालक मंडळाने प्रयत्न चालविले असून, परत घेण्यात आलेल्या साडेतीन कोटींच्या ठेवी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत जमा करण्यात आल्या आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने खामगाव जनता कर्मशियल को-ऑप. या बँकेकडे सुमारे ८ कोटी ४0 लाख रुपये मुदती ठेवीच्या रूपाने ठेवले होते. मात्र, जनता बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने कलम ३५ अ अन्वये निर्बंध लादल्यामुळे कृउबासच्या साडेआठ कोटींच्या ठेवी अडकल्या होत्या. दरम्यान, या मुदती ठेवी परत मिळविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले. कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल २0१५ मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर नवीन संचालक मंडळाने संबंधित बँकेशी वारंवार पाठपुरावा केला. ठेवी परत मिळविण्याच्या दृष्टिकोनातून ३ सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पत्रव्यवहार केला. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने खामगाव जनता बँकेवरील आर्थिक निर्बंध उठविल्याची माहिती पत्र व्यवहाराद्वारे २८ ऑगस्ट २0१५ रोजी दिली. त्यानंतर १९ सप्टेंबर २0१४ ते ९ फेब्रुवारी २0१६ या कालावधीत मुदत पूर्ण झालेल्या ३ कोटी २३ लाख, ९५ हजार, ६४६ रुपयांच्या ठेवी परत मिळविल्या आहेत.
खामगाव बाजार समितीला परत मिळाल्या ३५0 कोटींच्या ठेवी!
By admin | Updated: March 3, 2016 02:16 IST