शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार शेतक-यांपैकी १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:13 IST

मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसरकारची कर्जमाफीची योजना फसवी - शिवसेनेचे आरोपसरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.मेहकर तालुक्यात अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. दरवर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. विविध बँकांचा कर्जाचा बोजा शेतकºयांवर वाढतच आहे. सरकार कडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजप सरकारने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. मात्र, सरकारने कर्जाचा अर्ज भरुन घेत असताना त्या अर्जामध्ये तब्बल ५६ अटी टाकल्या असून, बहुतांश अटी ह्या जाचक आहेत. कर्जमाफीचे अर्ज हे आॅनलाईन भरायचे आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मेहकर तालुक्यात १६१ ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रापैकी केवळ ७ केंद्र सुरु आहेत. तर या केंद्रावर थम्ब मशिन नाहीत, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे शेतकºयांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ आॅगस्ट रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांचे नेतृत्वात विभागप्रमुख राजु चव्हाण, प्रमोद काळे, अशोक बोरकर, गणेश  शेवाळे, संदीप गायकवाड, उत्तम परमाळे, रोहीदास जाधव, अशोक पसरटे, सुपाजी जाधव, तसेच प्रत्येक शाखा प्रमुखाने मेहकर तालुक्यातील प्रत्येक ई-सेवा केंद्रावर जाऊन किती शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले या संदर्भात माहिती घेतली असता जवळपास ३५ हजार शेतकºयांपैकी केवळ १६६ शेतकºयांनी कर्ज माफीचे अर्ज भरल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारच्या जाचक अटी, सुविधा नसणे, शेतकºयांमध्ये सरकार बद्दल रोष या सर्व गोष्टी पाहता सरकारची कर्जमाफीची घोषणा ही शेतकºयांची दिशाभुल करणारी व फसवी असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.