शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:35 IST

संग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देअनेक गावात शौचालयांचा वापर नाही गुडमॉर्निंग पथकाच्या स्थापनेकडे पं.स.चे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येते.संग्रामपूर तालुका हा संपूर्ण हगणदरीमुक्त करण्यासाठी १५ सप्टेंबर २0१७ ही डेडलाइन आहे. तालुक्यात एकूण ५0 ग्रामपंचायती असून, त्यापैकी २८ ग्रामपंचायती या हगणदरीमुक्त झाल्याचा आकडा हा फक्त कागदोपत्री दाखविण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात करमोडा गाव वगळता इतर हगणदरीमुक्त घोषित झालेल्या बहुतांश गावामध्ये नागरिक हे उघड्यावरच शौचास बसताना दिसत आहेत. सद्यस्थितीत २२ ग्रामपंचायती या अद्यापही हगणदरीमुक्त झालेल्या नाहीत. तसेच या ग्रामपंचायती हगणदरीमुक्त व्हाव्या याकरिता पंचायत समितीने साधी गुडमॉर्निंग पथकाचीही स्थापना केलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी हे उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कुठल्याही कारवाया करताना दिसून येत नसल्यामुळे व उघड्यावर शौचास बसणार्‍यांना गुडमॉर्निंग पथकाच्यावतीने कुठलीही समज दिली जात नसल्यामुळे कागदोपत्री हगणदरीमुक्त झालेल्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिक हे उघड्यावरच शौचास बसत आहेत. त्यामुळे ही गावे हगणदरीमुक्त कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.सन २0१२ च्या बेसलाइन सर्व्हेनुसार तालुक्यात एकूण २२ हजार ७0 एवढी कुटुंब संख्या होती. त्यापैकी ९ हजार ९७९ कुटुंबांकडे त्यावेळी बेसलाइन सर्व्हेनुसार शौचालये होती. तर शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १२ हजार ९१ एवढी होती. सन २0१३-१४ मध्ये १ हजार ६२, सन २0१४-१५ मध्ये १ हजार १९0, सन २0१५-१६ मध्ये १ हजार ५२४, सन २0१६-१७ मध्ये ३ हजार १६ तर २0१७ ते ऑगस्ट २0१७ पर्यंत १ हजार १४९ शौचालयाचे असे एकूण चार वर्षांमध्ये ७ हजार ९४१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण होऊन या शौचालयाचा वापर नागरिक करीत असल्याचा आकडा दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात काही कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम तर केले; मात्र या शौचालयाचा वापर हे कुटुंब करीत नसल्यामुळे स्वच्छ भारत मिशनचा उद्देश सफल झालेला नाही. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या कुटुंबातील नागरिक आजही उघड्यावरच शौचास बसत आहेत. त्यामुळे गाव परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.                        

पंचायत समिती स्तरावर गुडमॉर्निंग पथकाची स्थापना झालेली नाही; मात्र ग्रामपंचायत स्तरावर पथक स्थापन झाल्यास त्यामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता हे सहभागी होत असतात.- डी.आर. हिरोळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, संग्रामपूर