शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांच्या सात जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

By संदीप वानखेडे | Updated: September 6, 2022 18:43 IST

सदस्यपदांच्या ६६ जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये हाेणार लढत

बुलढाणा : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ६ सप्टेंबरपर्यंत मुदत हाेती़ सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. थेट जनतेतून सरपंचाची निवड हाेणार असल्याने चुरस वाढली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ३४ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहेत. त्यामुळे, आता १०९ उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जामाेद तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहणार आहे़

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़ सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे़ त्यामुळे, उमेदवारांची संख्या वाढली हाेती़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे काेण घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. संग्रामपूर तालुक्यातील सायखेड येथे सरपंचपदासाठी आठ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते़ त्यापैकी दाेन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सहा उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणा भाेटा येथे सरपंचपदासाठी १० उमेदवार रिंगणात हाेते, त्यापैकी ५ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने पाच जणांमध्ये लढत हाेणार आहे. 

लाेणार तालुक्यातील दाेन ग्रामपंचातींच्या सरपंचपदासाठी १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी १० जणांनी माघार घेतल्याने ७ जणांमध्ये लढत हाेणार आहे. तसेच चिखली तालुक्यातील तीन जागांसाठी ११ अर्ज वैध ठरले हाेते. त्यापैकी एकाने मागे घेतल्याने १० उमेदवारांमध्ये लढत हाेणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकbuldhanaबुलडाणा