शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिका-यांची २७ पदे रिक्त

By admin | Updated: November 17, 2014 00:53 IST

बुलडाणा जिल्ह्यात तापाचे थैमान : आरोग्य विभाग डायलेसिसवर.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. आतापर्यंत तापाचे १५ बळी गेले, तर शेकडो रुग्ण आजही तापाने फणफणत आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखाने फुल्ल झाले असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग डायलेसिसवर आहे. जिल्ह्यात ५२ प्रथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत असलेल्या उपकेंद्र आणि इतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची २७ पदे रिक्त असल्याची धक्कादायक महिती आहे. याशिवाय तालुका आरोग्य अधिकार्‍यांची ५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जि.प.ची आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यास कुचकामी ठरत आहे. संपूर्ण राज्यात सध्या डेंग्यू या महा भयानक रोगाने थैमान घातले आहे. थंडी वाजून तीव्र ताप येणे, अंग दुखणे अशा आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात अशा प्रकारच्या तापाने आतापर्यंत १५ रुग्णांचा हकनाक बळी गेला. जिल्ह्यात सुरू असलेल्या या आजारावर नियंत्रण ठेवण्यास आरोग्य विभाग कमी पडत असल्याचा प्रत्यय येत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली असता जिल्ह्यात आरोग्य अधिकार्‍यांची तब्बल २७ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तर ५ तालुका आरोग्य अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा या जिल्हा मुख्यलयी असलेले तालुका आरोग्य अधिकार्‍याचेही पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत उपकेंद्राचीही संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे; मात्र या रुग्णालयात डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णालयाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. आलेल्या रुग्णांची ता पाच्या गोळ्या देऊन बोळवण केल्या जाते जात आहे.*खासगी रुग्णालय झाले फुल्लग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्राच्या इमारती उभारण्या त आल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा व रुग्णालयात औषधी उपलब्ध आहे; मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे या आरोग्य केंद्राचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होत नाही. रुग्णांना आरोग्याचा सुविधा मिळत नाही. आलेल्या रुग्णांना तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केल्या जाते. त्यामुळे परिस्थिती नसतानाही रुग्णांना पैसे मोजून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी सध्या शहरातील खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत.*आरोग्य सेवकांची ६३ पदे रिक्तवैद्यकीय अधिकार्‍यांपाठोपाठ जिल्हा परिषद आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा असलेल्या आरोग्य सेवकाची जिल्ह्यात ३0२ पदे आहेत. त्यापैकी ६३ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. तर ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती गरज असताना ग्रामीण भागात आरोग्य सेवक फिरकातानाही दिसत नाही. आरोग्य सेवक हे शहरात व विशेषत: शासकीय कार्यालयात जुंपले आहेत. तापाचे शेकडो रुग्ण वार्‍यावर सोडून आरोग्य विभागात वरिष्ठांची मर्जी सांभाळा आणि नोकरी करा, असा प्रकार सुरू आहे.