शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २६0 प्रकरणं दाखल

By admin | Updated: November 8, 2016 02:16 IST

वनक्षेत्रात वृक्षांची कत्तल सुरुच!

बुलडाणा, दि. ७- जिल्हा वन वैभवाने नटलेला असून ज्ञानगंगा, अंबाबरवासारखे अभयारण्य आणि लोणार येथील जागतिक ख्यातीचे लोणार सरोवर पर्यटकांना भुरळ घालतात. वन व वन्य प्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. मानवी अट्टाहासापायी वृक्षांची होणारी कत्तल आज मोठय़ा प्रमाणात सुरू असून, याप्रकरणी वर्षभरात २६0 गुन्हे दाखल झाले आहेत.वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील वनवैभव गुद्मरु लागले आहे. लाकूड तस्करांची कुर्‍हाड मोल्यवान वृक्ष संपदा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. शेकडो वन औषध आणि विविध वन प्राण्यांसह पक्ष्यांच्या प्रजातींनी नटलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे वनवैभव टिकविण्याची मोठी जबाबदारी जिल्हावासीयांवर आली आहे. यात बुलडाणा वन परिक्षेत्रात गत एक वर्षात ३0७ वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची माहिती पुढे आली. जिल्ह्याला ८४0 चौरस कि.मीचे वनक्षेत्र लाभले असून, यात ७५५ चौ.कि.मी. राखीव व ७७.६५ चौ.कि.मी संरक्षित क्षेत्र आहे, तरी या वनराईवर अवैध वृक्षतोड करणार्‍यांची वक्रदृष्टी आहे. याबाबत वन विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्याचे ६.१0 टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात आले. वनक्षेत्रातील सागवन वृक्षाला लाकूड तस्करांनी प्रमुख लक्ष्य करून अनेक सागवृक्ष भुईसपाट केले.दहा महिन्यात ५९ प्रकरणंअवैध वृक्षतोड, प्राण्याची शिकार व अवैध वाहतूक तसेच वन जमिनीवर अतिक्रमण आदी घटना बुलडाणा वन क्षेत्रांमध्ये कमी झाल्याचे बोलले जात असताना, गत दहा महिन्यात या प्रकारातील ५९ प्रकरणं वन विभागाच्या दप्तरी नोंदविण्यात आले. यात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ५0 हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तर गत वर्षीचे ३४ प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत.