शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२५0 वर्षांची परंपरा संकटमोचन गणपती

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

लोणार येथील सरोवराच्या काठावरील संकट मोचन गणपतीचे मंदीर.

लोणार : खार्‍या पाण्याच्या सरोवरामुळे संपूर्ण विश्‍वात प्रख्यात असलेल्या लोणार शहराला पौराणिक तसेच धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले आहे. याच खार्‍या पाण्याच्या सरोवराच्या काठावर दक्षिण दिशेला मंठा रोडवर गुंधा येथील येऊल यांनी २५0 वर्षापूर्वी प.पू.संत श्री सखाराम महाराज यांच्या हस्ते संकट मोचन गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. लोणार येथील हे मंदिर प्राचीन असून लोणार शहरापासून काही अं तरावरच मराठवाड्याला सुरुवात होते. पूर्वी मराठवाड्यावर निजामांचे वर्चस्व असल्याने या मंदिरापासून निजामांची हद्द सुरुवात होत होती. तेव्हा लोणारहून मराठवाड्यात सुखरुप जाणे-येणे व्हावे यासाठी याठिकाणी संकटमोचन गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, अशी अख्यायीका आहे. नं तर या मंदिराची येथील रतनलाल संचेती यांनी डागडुजी केली. या मंदिरातील गणरायांची मूर्ती ही अतिशय आकर्षक असून, संकट मोचन म्हणून या गणपतीची परिसरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थीला गणेश भाविक भक्त मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. सध्या गणेशोत्सव सुरु असल्यामुळे गणेशभक्तांची दररोज मंदिरात वर्दळ आहे. यामुळे मंदिराला मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे मंदिर शहरापासून थोडया अंतरावर असल्याने रस्त्यावर पहाटे ४ वाजेपासून भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. तसेच आजुबाजुच्या परिसरातूनही मोठय़ा प्रमाणात भक्तगण याठिकाणी येतात. गणेशोत्सवा बरोबरच दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थीलाही भाविकांची मांदियाळी येथे जमते.