शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २५ रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:43 IST

सध्या जिल्ह्यात बुलडाणा आणि खामगाव येथे प्रत्येकी तीन आणि शेगाव येथे दोन अशा आठ रुग्णावर उपाचर करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील ३६ कोरोना बाधितांपैकी २५ जणांनी कोरोनावर मात केली असून २३ मे रोजी आठ वर्षीय किडणीच्या आजाराने ग्रस्त मलकापूर पांग्रा येथील मुलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकत गाव गाठले. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता जिल्ह्यातील कोरोना बाधितांपैकी ६९ टक्के रुग्ण बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.कोरोना बाधीत रुग्णाचा पश्चिम वºहाडात बुलडाण्यात पहिला बळी गेला होता. त्यानंतर बुलडाणा जिल्हा हा विदर्भात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र प्रशासकीय पातळीवरील तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी दिलेली साथ याच्या जोरावर बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साथ नियंत्रणात राहली. एकवेळ बुलडाणा जिल्हा हा जवळपास कोरोना मुक्त झाला होता. मात्र १० मे नंतर परजिल्ह्यातून स्वगृही परतणाऱ्यांची संख्या ७२ हजारांच्यावर गेली तेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. मात्र पोलिस, महसूल, आरोग्य व जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या शिक्षकांनी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे केल्यामुळे वर्तमान स्थितीत तरी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती तशी नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात बुलडाणा आणि खामगाव येथे प्रत्येकी तीन आणि शेगाव येथे दोन अशा आठ रुग्णावर उपाचर करण्यात येत आहेत. सोबतच १५ प्रतिबंधीत क्षेत्रातील ३४ हजार ४३० नागरिकांच्या सहा हजार ७४५ घरांचे १४४ पथकांद्वारे आरोग्यविषयक सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. परिणामस्वरुप संदिग्ध रुग्णांची माहिती त्वरित मिळत असून कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळतेय.प्रतिबंधीत क्षेत्रातील १३ जणांना तापजिल्ह्यातील १५ प्रतिबंधीत क्षेत्रातील १३ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, खोकला व तत्सम आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये हे १५ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. सुदैवाने या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आढळून येत असली तरी त्यापैकी एकालाही अद्याप कोवीड केअर सेंटरमध्ये रेफर करण्याची गरज भासलेली नाही. एकंदरीत आरोग्य विभागाची सर्व्हेक्षण करणारी पथके सर्वत्र बारकाईने नजर ठेवून आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा