शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:54 IST

 बुलडाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील विकास आराखड्यासाठी राज्यशासनाने १११ कोटी ६८ कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला असून पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील विकास आराखड्यासाठी राज्यशासनाने १११ कोटी ६८ कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला आहे. पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.पुरातत्व विभाग, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागा व अन्य विभागाच्या समन्वयातून हा विकास आराखडा पूर्णत्वास जाणार आहे.

- नीलेश जोशी

 बुलडाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील विकास आराखड्यासाठी राज्यशासनाने १११ कोटी ६८ कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला असून पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हा आराखडा वेगाने पुर्णत्वास जावा यासाठी तब्बल तीन वेळा बैठका घेऊन त्याच्या कामास वेग देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.दरम्यान, पुरातत्व विभाग, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागा व अन्य विभागाच्या समन्वयातून हा विकास आराखडा पूर्णत्वास जाणार आहे. त्यानुषगाने पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून त्यामधून प्रामुख्याने पुरातत्व विभागाशी संबंधित कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.यामध्ये लखुजी राजे भोसले राजवाडा विकास, चावडी (जीर्ण राजवाडा) विकास, सावकार वाडा, रंग महाल, काळा कोट किल्ला, समाधी (लघुजी राजे जाधव स्मारक विकास), रामेश्वर मंदीर, नीळकंठेश्वर मंदीर, चांदणी तलाव, सजणा बारवा, पुतळा बारव आणि राजवाड्यातील प्रसाधन गृहांची कामे करण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ जानेवारी २०१५ मध्ये जिजाऊ सृष्टीवरील कार्यक्रमादरम्यान विदर्भ पंढरी शेगावच्या धर्तीवर सिंदखेड राजा नगरीचा विकास करण्याची घोषणा केली होती. त्यास तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करून सिंदखेड राजा विकास आराखड्यास सर्वानुमते २८ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता देण्यात आली होती. दरम्यान तीन जानेवारी २०१६ ला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिकर समितीच्या बैटकीत सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली होती.त्यानुषंगाने ३१ मार्च २०१७ रोजी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा पर्यटन विकास आराखड्यास प्रत्यक्षात शासन निर्णय काढून प्रशासकीय मान्यता दिली होती. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सिंदखेड राजा विकास आराखड्यातील प्रथम टप्प्यातील २५ कोटी रुपयांच्या निधी पैकी दोन कोटी रुपयांचा निधी २०१६-१७ या वर्षात वितरीत करण्यात आला होता.त्यानुषंगाने नागपूर येथील क्रिएटीव्ह सर्कलकडून प्राप्त अंदाजपत्रकानुसार सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अंतर्गत सिंदखेड राजा स्मारकाच्या विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अल्पावधीतच त्यास मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रारंभी ३११ कोटींच्या घरात असलेला हा आराखडा काही काळ मंत्रालयीनस्तरावर पडून होतो. त्यानंतर त्यात सुधारणा करून तो १११ कोटी ६८ लाख रुपयांचा करण्यात आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा