लोणार (जि. बुलडाणा) : लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ मे रोजी होऊ घातलेल्या १८ संचालकांच्या निवडीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी ४ वाजतापर्यंंत २४१ उमेदवरांनी अर्ज विविध मतदार संघातून उमेदवारांनी दाखल केले आहेत. २७ एप्रिल अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडीसाठी ३१ मार्च पासून नामनिर्देशन पत्र भरावयला सुरुवात झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंंत १३ एप्रिल पर्यंंत १८ जागेसाठी २४१ नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सहकार यांच्याकडे प्राप्त झाले आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीकरीता लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी २४१ उमेदवारांनी विविध मतदार संघातून अर्ज भरले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या इतिहासात एवढे अर्ज पहिल्यांदाच आले आहेत. निवडणुकीच्या लढतीचे खरे चित्र २७ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारणच्या 0२ जागेसाठी ५२, अनुसूचित जाती जमातीच्या १ जागेसाठी १0, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या १ जागेसाठी १८, व्यापारी मतदार संघातून २ जागेसाठी २८, तर हमाल/मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी १५ तर सेवा सहकारी मतदार संघातून सर्वसाधारणच्या ७ जागांसाठी ७६ महिला राखीव २ जागांसाठी ८, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी १८, तर विमुक्त जाती भटक्या जमातीच्या १ जागेसाठी १६ अर्ज असे एकूण २४१ अर्ज विविध मतदार संघातून उमेदवारांनी भरले आहेत.
लोणार कृउबासच्या १८ जागेसाठी २४१ अर्ज
By admin | Updated: April 15, 2015 01:06 IST