शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२३०० वर्षांच्या पुरातन स्तूपाचे होणार जतन, ९९.७५ हेक्टर जमिनीला संरक्षक भिंत बांधणार

By सदानंद सिरसाट | Updated: January 20, 2025 08:21 IST

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात आढळलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा २३०० वर्षे जुना इतिहास सांगणारा ऐतिहासिक ठेवा बुद्ध स्तुपाचे जतन होणार आहे. शासनाने भोन येथील स्तूप ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केल्याची अधिसूचना ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली.

- सदानंद सिरसाट खामगाव (जि. बुलढाणा) - बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात आढळलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा २३०० वर्षे जुना इतिहास सांगणारा ऐतिहासिक ठेवा बुद्ध स्तुपाचे जतन होणार आहे. शासनाने भोन येथील स्तूप ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केल्याची अधिसूचना ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसांत हरकती मागविल्या. ती मुदत संपुष्टात आल्याने या स्थळाच्या जतनासाठीच्या उपाययोजनांना आता वेग येणार आहे.

पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात संग्रामपूर तालुक्यातील भोन गाव आहे. तेथे तब्बल ९९.७५ हेक्टर जमिनीला संरक्षक भिंत बांधून बुद्ध स्तूपाचे जतन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. त्यासाठी १ ऑक्टोबर २०२१ रोजी जलसंपदा विभागाने नाशिक पुरातत्त्व विभागाची तत्त्वतः मान्यता मिळविली. धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या मधोमध जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्राची निर्मिती होणार आहे. स्मारकाच्या सर्वच बाजू पाण्याने वेढलेल्या राहणार आहेत. 

उत्खननात काय आढळले ? गावात २००२ पासून पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात प्राथमिक टप्प्यात ५ वर्षे उत्खनन झाले. त्यामध्ये सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप आढळले. या स्तूपाचा पूर्ण रूपातील प्रदक्षिणा मार्ग सापडला.त्या काळातील परंपरेच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे आढळून आले.त्यात तत्कालीन अनेक विहिरी, नाणी, मृण्मयी अलंकार अशा विविध वस्तू सापडल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhistoryइतिहास