शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

२२ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम!

By admin | Updated: May 16, 2016 01:27 IST

बुलडाणा शहराचे तापमान ४३ अंशावर; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन.

बुलडाणा: राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून, जिल्हय़ातही या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मेपयर्ंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर २२ ते ३१ मे या कालावधीत उष्णलहरी हळूहळू कमी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.गत तीन ते चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर तापमानात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी. दिवसा विशेषत: सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.जिल्हय़ात उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाची व्यवस्था सज्ज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वार्डांमध्ये अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली असून, कूलर लावण्यात आले आहेत.उष्णलहरींपासून झालेल्या अपायांवर मात करण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी बाहेर जाणे अत्यावश्यक गरज असल्यास डोक्याला दुपदरी पांढरा रूमाल बांधावा, अंगात शक्यतोवर काळे व भडक रंगाचे कपडे घालू नये, सैल पांढरे कपडे घालावे, पायात पादत्राणे घालून चालावे. उन्हामध्ये फिरताना थोड्या थोड्या वेळाने सावलीमध्ये थांबावे. शेतमजूर व वीटभट्टीवर काम करणारे कामगार, रोजगार हमीवरील कामगार यांनी सकाळी व दुपारनंतर उशिरा अंगमेहनतीचे काम करावे, तसेच भरपूर पाणी प्यावे व अत्यावश्यक स्थितीत डोक्याला रूमाल बांधून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांनी केले आहे. बुलडाण्याचा पारा @44बुलडाणा शहरात गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा हा वाढताच आहे. सतत ४३-४४ अंश सेल्सिअस तापमान राहत असल्याने भरदुपारी गर्दीचे रस्ते ओस पडतात. शहरातील या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण आहेत.