शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२१0६ मतदारांचा मतदानाचा हक्क कायम राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 01:47 IST

हुतात्मा वीर जगदेवराव सह.सूतगिरणी निवडणूक : सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर निर्णय

मलकापूर (जि. बुलडाणा), दि. २२ : येथील हुतात्मा वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्या मतदार यादीतील २१0६ मतदारांची नावे कमी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली याचिकेवर २२ ऑगस्ट रोजी निर्णय होऊन सर्वोच्च न्यायालयाने ह्यत्याह्ण २१0६ मतदारांचा मतदान हक्क कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. येथील हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या प्रारुप मतदार यादीतील २२१२ मतदार संख्येवर विद्यमान संचालक गजानन लांडे, भोजराज शेलकर व अँड.साहेबराव मोरे या तीन संचालकांनी आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपावरून नागपूर येथील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अर्हता दिनांकापर्यंत दोन वर्षे पूर्ण झाली नसल्याने अपात्र म्हणून २२१२ मतदारांपैकी २१0६ मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली होती. सदर प्रकरण लावून धरत लांडे व शेलकर यांनी तब्बल ६४ तक्रारी केल्या होत्या. त्यावर मतदार यादीतील २१0६ मतदारांची नावे वगळण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा नागपूर येथील प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) यांनी २३ मे रोजी दिले होते. मतदारांची नावे कमी करण्याच्या निर्णयाविरुद्ध संचालक शरद पाटील व इतर तीन जणांनी त्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आल्यानंतर थांबविण्यात आली होती. उच्च न्यायालय नागपूर यांच्यासमोर दाखल झालेले रिटपिटीशन क्र. ३३0८/१६ हे निकाली काढत याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत २0१६ मतदार कमी करण्याचा निवडणूक अधिकार्‍यांचा आदेश कायम ठेवला होता, तसेच निवडणूक प्रक्रियेस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ जून २0१६ रोजी दिलेली स्थगिती उठवित १0 ऑगस्ट २0१६ पासून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्यात आल्याचे आदेश सहायक निबंधक सहकारी संस्था मलकापूर यांना देण्यात आले होते.