शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

खामगावात २0 टन तांदूळ पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:41 IST

खामगाव: काळ्या बाजारात जाणारा २0 टन रेशनचा तांदूळ येथील  शहर पोलिसांनी रविवारी सकाळी बाळापूर नाक्यावर पकडला.  त्यामुळे रेशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ठाणेदार यू. के.  जाधव यांनी स्वत: ही कारवाई करताना १४ चाकी ट्रकमधील  रेशनचा हा तांदूळ ट्रकसह जप्त केला. याप्रकरणी जीवनावश्यक  वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ट्रक चालकास अटक  करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेशनच्या मालाचा काळाबाजार उघडकीस शासनाने अधिग्रहित केलेल्या ट्रकमधून वाहतूकमोठे रॅकेट असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: काळ्या बाजारात जाणारा २0 टन रेशनचा तांदूळ येथील  शहर पोलिसांनी रविवारी सकाळी बाळापूर नाक्यावर पकडला.  त्यामुळे रेशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ठाणेदार यू. के.  जाधव यांनी स्वत: ही कारवाई करताना १४ चाकी ट्रकमधील  रेशनचा हा तांदूळ ट्रकसह जप्त केला. याप्रकरणी जीवनावश्यक  वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ट्रक चालकास अटक  करण्यात आली आहे.

जिल्हय़ातील रेशनचा माल हा नांदुरा येथे  जमा होऊन तो काळ्या बाजारात विकल्या जातो, अशी माहिती  पोलिसांना मिळाली आहे. रेशन माफियांचे रॅकेट संपूर्ण विदर्भात  पसरलेले असल्याची दाट शक्यता आहे. अमरावती, नागपूर तसेच  अकोला या ठिकाणी रेशनच्या मालाचे दलाल आहेत. रेशनचा  तांदूळ गोंदिया, भंडारा  येथील राइस मिलमध्ये आणून त्या ठिकाणी  पॉलिश केल्यानंतर खुल्या बाजारात याची चढय़ा भावाने विक्री  केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ट्रक भरून तांदळाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात  असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जाधव यांना मिळाली. त्यांनी  बाळापूर नाक्याजवळ ट्रक क्र. एमएच २८ एबी ७९६९ ला  थांबविले. त्याची तपासणी केली असता या ट्रकमध्ये २0 टन  तांदळाचा माल आढळून आला. हा ट्रक नांदुरा येथील रेशन  दुकानदार ओम राठी याच्या मालकीचा असून, शासनाकडून  रेशनच्या मालासाठी द्वारपोच योजनेंतर्गत अधिग्रहित करण्यात  आलेला आहे. या ट्रकद्वारे जिल्हय़ाबाहेर रेशनच्या मालाची वाह तूक करण्याची परवानगी नाही; परंतु निर्धारित ठिकाणी तांदुळाचे  वितरण करण्याऐवजी काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत  असताना पोलिसांनी ही कारवाई केली. ट्रकमालक ओम राठी, रा.  नांदुरा आणि ट्रकचालक शेख गणी शेख हुसैन रा. पिंपळगाव राजा  यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात  आला असून, ट्रकचालकास अटक केली आहे. ही कारवाई  ठाणेदार यू.के.जाधव यांच्या नेतृत्वात पीएसआय रामराव राठोड,  पोहेकॉ अनिल देशमुख, पोकॉ आगलावे, काशिनाथ जाधव, रवींद्र  वानखेडे, राऊत, टाकसाळ, शेळके यांनी केली. प्रकरणाचा तपास  पीएसआय राठोड करीत आहेत.

मोठे रॅकेट असण्याची शक्यतारेशनच्या मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता  असून, संपूर्ण विदर्भात याची पाळेमुळे पसरलेली असावीत, असा  पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जिल्हय़ातील  रेशनचा माल काळय़ा बाजारात नेण्यापूर्वी नांदुरा येथे गोळा केला  जातो. येथून हा माल गोंदिया, भंडारा जिल्हय़ातील राइस मिलमध्ये  जात असावा. रेशनचा काळाबाजार करताना संबंधित लोक हे  मालाचे पोते बदलतात. त्यामुळे माल रेशनचा आहे हे सिद्ध करणे  कठीण बनून जाते; परंतु खामगावात पकडलेल्या ट्रकच्या  चालकाकडे जीएसटी भरल्याची पावती नसणे, मालाची कोणतीही  अधिकृत पावती नसणे, तसेच शासनाने अधिग्रहित केलेला ट्रक  असल्याने सदर कारवाई करणे शक्य झाले.

७२ कट्टे तांदूळ पकडला; बुलडाणा पोलिसांची कारवाईबुलडाणा: शासकीय वितरण प्रणालीचा ७२ कट्टे तांदूळ काळ्या  बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी शनिवारी पकडला  असून, तांदुळाची वाहतूक करणार्‍या वाहनचालकास आणि  धान्याच्या मालकास ताब्यात घेण्यात आले आहे. शासकीय वाह तूक प्रणालीचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात  असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या  आधारे पोलिसांनी तपासणी सुरु केली असता तालुक्यातील दहिद  फाट्यावर ट्रक क्रमांक एमएच ४ डीएस ७२0७ या वाहनातून  शासकीय वितरणाचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात  येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर वाहनातून  तांदुळाचे ७२ कट्टे काळ्या बाजारात नेण्यात येत होते. पोलिसांनी  सदर ट्रकचा चालक शेख युनुस शेख अजीज वय २९ वर्ष व  धान्याचा मालक अनंत मधुकर सावजी वय ६२ वर्ष रा. बुलडाणा  या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून ७२ कट्टे  शासकीय तांदूळ अंदाजे किंमत ३६ हजार रुपये, एक मालवाहू  वाहन अंदाजे किंमत ३ लाख असा एकूण ३ लाख २६ हजारांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींच्या विरोधात  ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डीवायएसपी बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमित  वानखेडे, पोहेकॉ सुधाकर काळे, पोकॉ संदीप मिसाळ, अरुण  सानप, सतीश राठोड, चालक उमेश आखरे यांच्या पथकाने ही  कारवाई केली. 

रेशनच्या मालाचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट असावे, असा  आमचा अंदाज आहे. यामध्ये अमरावती, अकोला व नागपूर ये थील काही दलालांचा समावेश असू शकतो. त्यामुळे काहींची  नावेसुद्धा आम्ही प्राथमिक तपास अहवालात नोंदविली असून, या त काही निष्पन्न झाल्यास त्यांचाही समावेश आरोपींमध्ये केला  जाऊ शकतो. तसेच दाखल गुन्हय़ात वाढ होऊ शकते.- ठाणेदार यू.के.जाधव