लोणार (बुलडाणा): स्थानिक नगर पालिकेने २५ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेमध्ये लोणार नगर पालिकेचा सन २0१४-१५ चा सुधारित व २0१५-१६ चा अंदाजीत अर्थसंकल्प मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सादर केला. नगर परिषद लोणार ह्यकह्ण वर्ग असलेल्या लोणार न.प.तील सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभीक शिलकेसह महसुली व भांडवली जमा ७८ कोटी ३६ लाख ७७ हजार ६८0 व महसुली आणि भांडवली खर्च ७८ कोटी १६ लाख ६0 हजार असा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये प्रगतीपथावरील भांडवली कामे, नगर परिषद पाणीपुरवठा योजनेवर २0 कोटी, एकात्मीक गृहनिर्माण योजना टप्पा १ व २ वर १६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. विकासात्मक कामामध्ये महासुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेकरीता १५ कोटी रुपये, अग्नीशमन इमारतीकरीता ८५ लक्ष, नगर परिषदेचे नविन इमारतीकरीता ३ कोटी रुपये, तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून मिळणार्या १३ वा वित्त आयोग, १४ वा वित्त आयोग, वैशिष्टयपूर्ण योजना दलीतवस्ती योजना, रस्ता निधी, युडी.६ अंतर्गत निधी, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ निधी व इतर वेगवेगळ्या योजनेअंतर्गत मिळणार्या निधीतील विकासात्मक कामांचा समावेश असलेला अर्थसंकल्प मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षा सौ.रंजना राजेश मापारी यांचेकडे सर्वसाधारण सभेची मंजूरात घेणेसाठी सादर केला. सभेने सर्वानुमते मंजूरी प्रदान केली.
पाणीपुरवठा योजनेवर २0 कोटींची तरतूद
By admin | Updated: February 27, 2015 01:14 IST