शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काम न करताही अदा केले २ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:37 IST

मेहकर : तालुक्यातील कळपविहिर येथे झालेल्या महाजलच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदाराने काम न करता २ लाख ३४ हजार रुपये शिल्लक काढून निकृष्ट काम केले आहे. त्यामुळे ठेकेदार व समितीवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी विहिरीतील पाण्यात बसून उपोषण करण्याचा इशारा अशोक जगन्नाथ तांगडे यांनी दिला आहे. 

ठळक मुद्दे‘महाजल’चा पराक्रम कारवाईची मागणीकारवाईशिवाय पाइपलाइनचे काम सुरु न करण्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील कळपविहिर येथे झालेल्या महाजलच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदाराने काम न करता २ लाख ३४ हजार रुपये शिल्लक काढून निकृष्ट काम केले आहे. त्यामुळे ठेकेदार व समितीवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी विहिरीतील पाण्यात बसून उपोषण करण्याचा इशारा अशोक जगन्नाथ तांगडे यांनी दिला आहे. मेहकर तालुक्यातील कळपविहिर येथील पाणी प्रश्न मिटावा, यासाठी सन २0१४ मध्ये महाजल योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजना जवळपास ४९ लाखाचेवर होती. गावामध्ये सदर योजनेचे काम करीत असताना संबंधीत अधिकारी, ठेकेदार व समिती यांनी संगणमत करुन निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप अशोक तांगडे यांनी तक्रारीमध्ये केलेला आहे. लाखो रुपये खचरुनही या योजनेचे पाणी गावामध्ये आलेच नाही. पाईपलाईन अर्धवट आहे. जे काही थोडेफार पाईप टाकले आहेत ते पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. विहिरीवर जाळी नाही, इथरवाल, स्वीच रुम, विहिरीची खोली आदी कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे सदर प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच दोषींवर कारवाई करावी, यासाठी मेहकर येथील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय अधिकारी यांना वेळोवेळी तक्रारी तथा अनेक वेळा निवेदन दिले आहे. परंतु संबंधीत अधिकारी हे ठेकेदार व समितीला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे १४ ऑगस्ट पर्यंत चौकशी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाच्या दिवशी कळपविहिर येथील विहिरीतील पाण्यात बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक जगन्नाथ तांगडे यांनी दिला आहे. 

कळपविहिर येथे महाजल योजना मंजूर झाली असून, सदर योजना ४९ लाख ९0 हजारांची आहे. सदर योजनेचे २ हप्ते मिळाले असून, १ हप्ता बाकी असल्याने उर्वरीत काम अर्धवट आहे. सदर हप्ता भेटल्यानंतर काम पूर्ण करण्यात येईल.- विजय खिल्लारे, ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग,मेहकर.