खामगाव (बुलडाणा): श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वसुली अधिकार्याने ग्राहकांकडून तब्बल २ लाख ८0 हजाराची वसुली करीत सदर रकमेचा परस्पर अपहार करुन कंपनीला गंडविल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी येथील शहर पोस्टेत एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीचे अधिकारी विपुल रमेश सरोदे (३१) यांनी आज शहर पोस्टेत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीचा वसुली अधिकारी प्रशांत प्रभाकर धर्माधिकारी (३४) रा.रोकडीया नगर शेगाव याने मागील ३१ डिसेंबर २0१४ पूर्वी कंपनीकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांकडून २ लाख ८0 हजार ८२७ रुपयांची वसुली केली व सदर रक्कम कंपनीत न भरता त्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन कंपनीचा विश्वासघात केला, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी धर्माधिकारी याच्याविरुध्द कलम ४0६,४0९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ट्रान्सपोर्ट कंपनीला २ लाख ८0 हजाराने गंडविले
By admin | Updated: January 28, 2015 00:04 IST