शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

१८६ महिलांना मिळाले संरक्षण

By admin | Updated: November 21, 2015 01:58 IST

पोलीस दक्षता पथक; अत्याचार व छेडखानीप्रकरणी दिलासा.

बुलडाणा : जिल्ह्यातील महिलांवर होणार्‍या अत्याचारांचा आलेख वाढतो आहे. सर्वत्र महिला असुरक्षित असताना समाजात वावरणार्‍या महिला व युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात पोलीस विभागाचे महिला दक्षता पथक कार्यरत आहे. गत दोन वर्षात या पथकाने १८६ महिला व युवतींना मदतीचा हात देत, त्यांना कायदेशीर संरक्षण दिले. समाजात वावरणार्‍या असंख्य महिला व युवती अत्याचाराने पीडित आहेत. कधी कौटुंबीक अत्याचार, सार्वजनिक छेडखानी तर कधी शारीरिक अत्याचाराला त्या बळी पडत आहेत. असे जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांवरून स्पष्ट झाले आहे. यावर अंकुश बसावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाकडून जिल्हाभरात छेडछाड विरोधी मोहीम राबविण्यात आली होती. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वेस्टेशन व सार्वजनिक ठिकाणी मुली असुरक्षित आहेत. टवाळखोर मुलांकडून मुलींची छेडछाड झाल्याच्या नांदुरा, चिखली व बुलडाणा, मेहकर, मलकापूर शहरात घडल्या. बर्‍याच कौटुंबीक अत्याचारप्रकरणी पुढे आले होते. या गैरवर्तनाला बळी पडणार्‍या २0१४ मध्ये ८८ आणि २0१५ मध्ये ९८ अश्या एकूण १८६ महिला व युवतींना पथकाच्या सदस्यांनी घटनास्थळी संरक्षण दिले. शिवाय प्रकरणात दोषी आढलेल्या आरोपींवर कार्यवाही केली.