शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१८ टक्क्याने कीटकनाशके महागली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:16 IST

बुलडाणा: सध्या पिकांवर पडणार्‍या कीड व अळींना नष्ट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशके १८ टक्क्याने महागली असून, याचा भुर्दंड सध्या शेतकर्‍यांना बसत आहे. 

ठळक मुद्देफटका जीएसटीचाकीटकनाशक खरेदीत जीएसटीचा शेतकर्‍यांना भुर्दंड!कीटकनाशके फवारणी शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सध्या पिकांवर पडणार्‍या कीड व अळींना नष्ट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशके १८ टक्क्याने महागली असून, याचा भुर्दंड सध्या शेतकर्‍यांना बसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कपाशी तर यासह खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी विविध औषधांची फवारणी करून कीड नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पिकांवरील ही कीड नष्ट करून पिकांना वाचविण्याकरिता वेगवेगळे कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. तसेच पिकांची चांगली वाढ व्हावी, यासाठीसुद्धा शेतकरी कृषी केंद्रावरून वेगवेगळे औषधे खरेदी करतात; मात्र यावर्षी १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी शासनाने लागू केल्याने या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल झाले आहेत. या जीएसटीचा शेतीवरसुद्धा चांगलाच परिणाम झाला आहे. पूर्वी कीटकनाशकांसाठी ६ टक्के कर होता; मात्र आता जीएसटीमुळे १८ टक्के कीटकनाशकांसाठी कर लागू झाला आहे. जीएसटीमुळे कीटकनाशकांचे दर वाढले असून, याचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसत आहे. सध्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना कीटकनाशक खरेदी महत्त्वाचे असतानाच कीटकनाशकाचे दर  वाढले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक चक्र बिघडले असल्याचे दिसून येते. 

कीटकनाशके फवारणी शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेरपिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकनाशके फवारणी अत्यंत गरज निर्माण झाली आहे; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशकांचे दर १८ टक्क्याने वाढले असल्याने कीटकनाशके फवारणी सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीमुळे अनेक शेतकरी कीटकनाशके खरेदी करू शकत नाहीत. परिणामी पिकांवरील कीड नष्ट करणे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.