शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

१८ तास वीज गायब

By admin | Updated: October 5, 2014 00:59 IST

अनियमित विद्युतदाबामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील विद्युत उपकरणे जळाली.

सिंदखेडराजा(बुलडाणा) : तालुक्यात सद्यस्थितीत २४ तासापैकी तब्बल १८ तास विद्युत गुल राहत असल्याने शे तीला कृषी पंपाच्या सहाय्याने पाणी देत असलेले शेतकरी हैराण झाले आहेत. विद्युत दाब कमीअधिक होऊन कृषीपंप तसेच विद्युत उपकरणे जळून नुकसान होण्याच्या घटनाही दररोज घडत आहेत. तालुक्यामध्ये १३ हजार कृषी पंपाचे अधिकृत ग्राहक आहेत. याव्यतिरिक्त अनेक व्यक्ती चोरुन वीज वापरतात ते वेगळेच. २५ वर्षापासून शासनकर्त्यांंनी विद्युत प्रकल्प उभे न केल्यामुळे व विजेचा वापर वाढल्यामुळे भारनियमनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. दुसरबीड येथे १३२ के.व्ही.चे उपकेंद्र असून ११0 के.व्ही.वीज पुरवठा आहे. सिंदखेडराजा येथे ३३ केव्ही चे केंद्र असून त्यामध्ये २४ केव्ही वीजपुरवठा आहे. तर डावरगाव येथे ११ केव्हीचे केंद्र असून तेथे ७ केव्हीचा विजपुरवठा आहे. सद्यस्थितीत सोयाबीनसह कपाशी भुईमूंग, तूर व इतर पीके पावसाअभावी वाळायला लागली आहे. तालुक्यात केवळ ४ ते ६ तास वीज मिळत असून, त्यामध्येही विद्युतचा कमी जास्त दाब होणे नित्याचे झाले आहे. विद्युतच्या कमी अधिक दाबामुळे विद्युत रोहित्र, कृषी पंप यासह अनेक विद्युत उपकरणे जळत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील नशिराबाद, माळसावरगाव, सावखेड तेजन, अंचली यासह तालुक्यातील इ तर ठिकाणी सकाळी ६ वाजता विद्युत पुरवठा सुरु होतो. तर दुपारी १२ वाजता पुन्हा बंद केला जा तो. त्यानंतर दुसर्‍या दिवशीही हीच परिस्थिती राहत असून विद्युत मिळणार्‍या ६ तासात कमीअधिक दाब होणे सुरुच असते. या अवाजवी भारनियमनाने शहरवासियांसह शेतकरी हैराण झाले असून, ये थील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

*सिंदखेडराजा शहराचे विद्युत बिल थकले

 सिंदखेडराजा शहरामध्ये प्रत्येक महिन्याला १२ लाख रुपयाचे घरगुती विद्युत बिल येते. यातील ८0 टक्के विद्युत बिल महिन्याला भरणे आवश्यक असते. परंतु शहरवासींकडून यातील केवळ २७ ट क्केच बिल भरल्या जात असल्याने वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केल्या जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून नियमीत विद्युत बिल भरल्या जाते त्यांनाही भारनियमनाचा नाहक फटका बसतो.