शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नऊ विभागातील १७१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:19 IST

Buldhana News पोलिस विभागातील चार अधिकाऱ्यांसह एकूण २० अधिकारी कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  कोरोना संसर्गची व्याप्ती जिल्ह्यात अलिकडील काळात कमी होत असल्याचे चित्र असून गेल्या सात महिन्यात नऊ प्रशासकीय विभागातील तब्बल १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आनंदाची बाबा म्हणजे यापैकी १५१ जणांनी कोरोनावर मात करून पुर्ववत आपला पदभार सांभाळला असल्याचे चित्र आहे.मात्र गेल्या दहा दिवसात पोलिस विभागातील चार अधिकाऱ्यांसह एकूण २० अधिकारी कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहे. तेही लवकरच कोरोनामुक्त होवून आपला पदभार पुन्हा स्वीकारतील असा सकारात्मक आशावाद प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.कोरोना बाधीत आढळून आलेल्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पोलिस विभाग, महसूल विभाग, पालिका, वैद्यकीय, मृद व जलसंधारण, कृषी विभाग, गृहरक्षक दल आणि एसटी महामंळ या नऊ प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.एकंदरीत विचार करता उपरोक्त नऊ प्रशासकीय विभागातील ७,४२४ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी २.३० टक्के अर्थात १७१ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. वेळोवेळी आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीमध्ये या व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्याने त्यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या पैकी १५१ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही २० जणांवर उपचार सुरू आहेत.

पोलिस विभागाला सर्वाधिक बाधा

गेल्या सात महिन्यात प्रामुख्याने पोलिस विभाग कोरोना संगर्गाने अधिक ग्रासल्या गेल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस विभागातील दहा अधिकारी आणि ७८ कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते. हा आकडा ८८ च्या आसपास आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसातच पोलिस विभागातील चार अधिकारी सात कर्मचारी असे एकूण ११ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. पोलिस विभागातील एका कर्मचाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी अैारंगाबाद येथे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याची नोंद अद्याप जिल्ह्यात झालेली नाही.

पालिकांमधीलही कर्मचारी बाधीतजिल्हयातील ११ पालिका व दोन नगरपंचायती मिळून आतापर्यंत २४ कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहेत.  हे सर्व कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून पुर्ववत कामावर हजर झाले आहेत.  वर्तमान स्थितीत  राज्य परीवहन महामंडळातील आठ, क्षय आरोग्य धाममधील एक आणि पोलिस विभागातील ११ असे २० जण बाधीत असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या