शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

१७ टरबूज उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई

By admin | Updated: May 6, 2016 02:23 IST

शेतक-यांच्या लढय़ाचा ‘लोकमत’ने प्रभावी पाठपुरावा केला.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : बोगस टरबूज बियाण्यांमुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुष्काळाने शेतकर्‍यांचे बेहाल असताना टरबुजाचे पीकही हातचे गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे कंपनीविरोधात एल्गार पुकारला होता. शेतकर्‍यांचा हा लढा यशस्वी ठरला असून, कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. शेतकर्‍यांच्या या लढय़ाचा ह्यलोकमतह्णने प्रभावी पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 कंपनीचे टरबूज बियाण्याची लागवड केली होती. मात्र हे बियाणे निकृष्ट निघाल्याने चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही या टरबुजाच्या वेलाला लागलेले फळेही पूर्णपणे भरले नाही. तसेच त्यांची वाढही खुंटली होती. या प्रकाराबाबत संबंधित शेतकर्‍यांनी ही बाब सदर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे सांगितली. परंतु कंपनी डिस्ट्रीब्युटरने टोलवा टोलवीचे उत्तरे दिली. शेतकर्‍यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेतकर्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली व या आंदोलनाचर्ी ह्यलोकमतह्णने वृत्त मालिका प्रकाशित केल्यामुळे अखेर कंपनीने या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ४ एप्रिल रोजी या १७ शेतकर्‍यांना ५ हजार प्रतिएकरप्रमाणे बियाण्यांची नुकसानभरपाई दिली. लागवड करून ४ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच वेलाला लागलेल्या फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडल्यामुळे या फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच भरत होते व या फळाचा आकार गोल नसल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसानभरपाई द्यावी, याकरिता रिजनल मॅनेजरकडे मागणी केली होती. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली होती. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवालही दिला होता. परंतु कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नव्हती.