शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१६ शिक्षकांना जात पडताळणीचे आदेश

By admin | Updated: November 24, 2015 01:24 IST

जात पडताळणीसाठी ३0 नोव्हेंबर शेवटची तारीख.

अशोक इंगळे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): पंचायत समितीसह बुलडाणा जि.प. मधील शिक्षण विभागात १६ शिक्षक स.अ.विमुक्त जाती भटक्या जमाती या जातीच्या प्रमाणपत्रावर शिक्षक म्हणून कार्यरत आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यात ही जातच अस्तित्वात नसल्याने भामटा राजपूत जातीचे प्रमाणपत्र असलेल्या शिक्षक कर्मचार्‍यांनी अद्यापपर्यंंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्या शिक्षकांना जात पडताळणीसाठी ३0 नोव्हेंबर शेवटची तारीख देण्यात आली आहे. या तारखेच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना बडतर्फ करणार असल्याचे आदेश जि.प.शिक्षण विभागाने बजावले आहेत. बुलडाणा जि.प.सह शासकीय, निमशासकीय पदावर कार्यरत होण्यासाठी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र, जातीचे बनावट प्रमाणपत्र असे विविध बनावट प्रमाणपत्र मिळवून काही युवक नोकरीत सामिल झाले. ज्यावेळी जात प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ येते, त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांना लाखोचे आमिष दाखवून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. खोटे, बनावट दस्ताऐवज तयार करणारी टोळी बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय असल्याचे या अगोदर निदर्शनात आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यात भामटा राजपूत ही जात अस्तित्वात नसताना एका शिक्षकाने जात प्रमाणपत्र जोडले असल्याने त्यांनाही जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बजावले आहेत. तसेच बुलडाणा जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या, जमाती ही जात अस्तित्वात नसल्याने बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये १६ शिक्षकांना अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र अकोला येथून मिळाले नाही. त्यांनी ३0 नोव्हेंबर पर्यंंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची १ डिसेंबरपासून सेवा समाप्त करण्याचे आदेश मिळू शकतात, अशीही माहिती पंचायत समितीमधून मिळाली आहे. १६ शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी २३ नोव्हेंबरला किरकोळ रजा टाकून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली असून, सेवा समितीवर स्टे मिळविण्यासाठी अपील दखल करणार असल्याची माहिती आहे.