शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

दीडशे कोटींचा प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा : तलाठ्याच्या कारनाम्यावर वरिष्ठांचे पांघरूण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 14:17 IST

घोटाळा उघडकीस आल्यानंतरही महसूलच्या बड्या अधिकाऱ्यामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुळ मालक बदलवून खामगावात शंभरपेक्षा जास्त जणांची फसवूणक करण्यात आली. तलाठ्याच्या प्लॉट खरेदी-विक्रीच्या घोटाळ्यावर वरिष्ठांचे ‘पांघरूण’ असल्याचे दिसून येते. घोटाळा उघडकीस आल्यानंतरही महसूलच्या बड्या अधिकाऱ्यामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.खामगाव भाग- १ चा तलाठी राजेश चोपडे याने शहरातील मोक्याच्या आणि महागड्या जागांचा शोध घेतला. त्यानंतर मयत झालेल्या, बाहेरगावी असलेल्या मालमत्तांचे मुळ मालक बदलवून त्यांचे प्लॉट परस्पर विकले. याचा महसूल कार्यालयात भंडाफोड झाल्यानंतर एक बडा अधिकारी तलाठी चोपडेंना पाठीशी घालित राहीला. चोपडेकडे अंगुलीनिर्देशक करणारे मंडळ अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी सदैव महसुल विभागाच्या या बड्या अधिकाºयाच्या रडारवर राहीले.ठराविक दलालामार्फतच प्लॉटची विक्री!मुळ मालक बदलविल्यानंतर प्लॉटची खरेदी-विक्री करताना तलाठी चोपडे हा काही ठराविक दलालांचीच निवड करायचा. यातील एका विश्वासू दलालाने कमी किंमतीत प्लॉट उपलब्ध करून देण्याचे आमिष देत अनेकांना गंडा घातला. फसवणूक झालेल्यांची संख्या ही शंभरावर गेली असून चोपडेच्या मर्जीतील एका विश्वासू दलालाने २५ पेक्षा अधिक जणांना गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये शेगाव रोडवरील प्लॉट धारकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

वरिष्ठांच्या मर्जीनेच चोपडेची विदेशवारी!अनेकांना गंडा घालून सद्यस्थितीत निलंबित आणि फरारी असलेल्या तलाठी राजेश चोपडे याची विदेशवारीही चर्चेत आली आहे. सन २०१७ ते २०१९ या कालावधीत तलाठी चोपडे याने केलेल्या विविध विदेश वाऱ्यांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय विदेश वाºया केल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव