शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही १५ गावात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:14 IST

यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, विविध प्रकल्पात  असलेला अल्प जलसाठा, दिवसागणिक भूगर्भातील खोल  जात असलेली पाणी पातळी यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यां तील १५ गावांमध्ये पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण  झाली आहे. परिणामी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्या त येत आहे. 

ठळक मुद्देटंचाईग्रस्त गावात टँकरने पाणीपुरवठाविविध प्रकल्पात अल्प जलसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस, विविध प्रकल्पात  असलेला अल्प जलसाठा, दिवसागणिक भूगर्भातील खोल  जात असलेली पाणी पातळी यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यां तील १५ गावांमध्ये पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण  झाली आहे. परिणामी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्या त येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी  पावसाचे अत्यल्प असल्यामुळे  अर्धेअधिक प्रकल्प तहानलेले होते; परंतु नोव्हेंबर ते डिसेंबर  महिन्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम लघू  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध झाला होता. अनेक  शेतकर्‍यांनी या प्रकल्पातील पाण्याचा सिंचनासाठी वापर  केला होता. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात हे प्रकल्प अध्र्यावर  आले होते. दाहकत्या उन्हामुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन,  सिंचनासाठी पाण्याचा भरमसाट वापर या कारणामुळे  जिल्ह्यातील ५५ लघू प्रकल्प कोरडेठाक पडले तर अद्यापही  तोरणा, मन हे दोन मध्यम प्रकल्प शेवटच्या घटका मोजत  आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून  गेला आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील एकाही नदी- नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे आजही जिल्ह्यातील  मोठय़ा, मध्यम लघू प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे.  तीन महिन्यात जो काही पाऊस पडला तो फक्त पिकासाठीच  पोषक ठरला आहे. सध्या स्थितीत प्रकल्पात पाणीसाठा उ पलब्ध नसल्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना  प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याचे दिवस अस ताना जिल्ह्यातील १५ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा  लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावातील नागरिकांची  पाण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी या गावांना १५  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर पाणीटंचाईवर  उपाययोजना म्हणून प्रशासनाने विंधन विहिरी, नळ योजनेची  विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, टँकरने पाणी पुरवठा खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. येत्या  काही दिवसात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यास  पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.   

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असलेली गावेबुलडाणा तालुक्यातील गोंधनखेड, पिंपरखेड या गावाला प्र त्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर चिखली  तालुक्यातील मेरा बुद्रुक एक टँकर, देऊळगावराजा तालु क्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, धोत्रा नंदई प्रत्येकी एक  टँकर, मेहकर तालुक्यतील दुर्गबोरी, पारडी, बोथा, वरवंड  घुटी या गावासाठी प्रत्येकी एक टँकर, सिंदखेड राजा तालु क्यातील सोनोशी, सावरगाव, माळ, सुजलगाव प्रत्येकी एक  टँकर खामगाव तालुक्यातील जळका तेली या गावासाठी  एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.