शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

१५ दिवसात तुरीच्या भावात तीन हजार रूपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:03 PM

Agriculture News तुरीला बाजारात ९ हजार रुपए प्रती क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे.

ठळक मुद्दे चार ते पाच दिवसांआधी तुरीचे भाव आठ हजार रुपए प्रती क्विंटल होते.पंधरा दिवसांपूर्वी तूरीचे भाव सहा हजार रुपए प्रतीक्विंटल होते.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तुरीची आवक घटल्याने गत पंधरा दिवसात तुरीच्या भावात तीन हजार रूपयांची वाढ झाली आहे. तुरीला बाजारात ९ हजार रुपए प्रती क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी तूरीचे भाव सहा हजार रुपए प्रतीक्विंटल होते.गतवर्षी कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केली नव्हती. त्यामुळे तुरीसह अन्य शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकºयांनी शेतमालाची विक्री केली. त्यामुळे यावर्षी खरीप हंगाम सुरू असतानाही शेतमालाची विक्री करण्यात आली. तसेच तुरीचीही उशीरापर्यंत विक्री करण्यात आली. मात्र आता गत काही दिवसांपासून तुरीची आवक घटली आहे. यावर्षी शेतकºयांनी तुरीची पेरणी केली असून, डिसेंबर- जानेवारी महिन्यामध्ये तूर विक्रीसाठी येणार आहे. बाजारात तूर विक्रीसाठी येत नसल्याने गत पंधरा दिवसात तुरीच्या भावात तब्बल तीन हजार रूपयांनी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तूरीचे भाव सहा हजार रुपए प्रतीक्विंटल होते. त्यामध्ये आता वाढ होऊन नऊ हजार रुपए प्रती क्विंटल झाले आहे. चार ते पाच दिवसांआधी तुरीचे भाव आठ हजार रुपए प्रती क्विंटल होते. तुरीचे हमीभाव शासनाने सहा हजार रुपए जाहीर केले आहे. हमीभावापेक्षा तीन हजार रुपए जास्त भाव सध्या बाजारात तुरीला मिळत आहे. यावर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबिन, कपाशी, मूग व उडिदासह तुरीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी तुरीच्या उत्पादनही घट येण्याची शक्यता आहे. तूर डिसेंबर - जानेवारी महिन्यामध्ये बाजारात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तुरीच्या भावातील चढ उतार कसा राहील याकडे तूर उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्र