शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षात १४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

By admin | Updated: May 19, 2017 00:33 IST

सततची नापिकी, बँकांचे कर्ज, सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या

अमोल ठाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: पावसाची अनियमितता, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून १७ वर्षात संग्रामपूर तालुक्यातील १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आत्महत्येचा आलेख चढताच असून, यावर शासनाकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना होत नसल्यामुळे तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच असल्याचे चित्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.दरवर्षी शेतकरी हा पावसाळ्याला सुरुवात झाली की मोठ्या आशेने संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करून महागडे बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करतो. हे महागडे बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याकरिता तो बँकांकडून पीक कर्ज तसेच बँकांकडून शेतीवर कर्ज काढतो. या महागड्या बियाण्याची पावसाच्या आशेवर पेरणी ही करतो; मात्र पेरणी आटोपल्यानंतर पावसाचे पाणीच महिना दीड महिना हजेरी लावत नाही. परिणामी शेतीत टाकलेले महागडे बी-बियाणे कोमेजून जाते व शेतकऱ्यांची निराशा होते. मात्र तरीही शेतकरी निराश न होता घरातील आपल्या अर्धांगिनीचे दागदागिने व घरातील सोने तसेच सावकाराकडून कर्ज काढून परत नव्या जोमाने शेतात पेरणी करतो; परंतु दुबार पेरणी झाल्यानंतर पिकांना अपेक्षित असलेला पाऊस होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटते व त्यामुळे शेतकऱ्याला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न होत नाही. शेतीतून मिळालेले उत्पन्न हे अल्प असल्यामुळे व पिकांपासून मिळालेले उत्पादन हे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून जाते. शेतीमधून मिळालेल्या तोकड्या उत्पन्नामधून त्याला घरातील मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, बँकाचे कर्ज, सावकारीचे कर्ज व घरातील गहान ठेवलेले दागदागिने तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करणे होत नाही परिणामी शेतकऱ्यांना निराश व्हावे लागते. तसेच या दुष्काळी काळात शासनाकडूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेवटी शेतकऱ्याला मृत्यूच्या दारात उभे राहून आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे.संग्रामपूर तालुक्यात सन २००३ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. तालुक्यात सन २००१ पासून ते एप्रिल २०१७ पर्यंत या १७ वर्षात एकूण १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून, यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सन २०१५ मध्ये झालेल्या आहेत. २०१५ मध्ये २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती विभागामध्ये आहे. दरम्यान, या १४७ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी फक्त ६९ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण बघता शासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.