शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-याकडून १४ तोळे चोरीचे सोने जप्त

By admin | Updated: August 28, 2016 23:32 IST

जालना शहर पोलिसांची देऊळगावराजा येथे कारवाई.

देऊळगावराजा(जि. बुलडाणा),दि. २८: जालना शहर व परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षात अशोक सुरवशे याने अनेक ठिकाणी घरफोड्या करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केलेली आहे. जालना पोलीस दोन वर्षांंपासून त्याच्या शोधात होते. २५ ऑगस्ट रोजी त्यास पकडण्यात आले असता त्याने चोरी केलेले सोने सराफा लाइनमधील एका ज्वेलर्सचे मालक सुजित भाऊलाल साहुजी यांना विकल्याचे सांगितल्यावरून तपासी अधिकारी जे.एम. परदेसी यांनी त्यांच्या सहकार्‍यासह येऊन या व्या पार्‍याकडून १४ तोळे सोन्याची वसुली केली. या घटनेमुळे सराफा लाइनमध्ये एकच खळबळ उडाली.जालना येथील कुख्यात चोर अशोक सुरवशे याने यापूर्वी जालना परिसरातील अनेक ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत. त्याचा हा नेहमीचाच प्रकार आहे. गत दोन ते तीन वर्षांंंपासून पोलिसांना चकमा देऊन तो गायब होता. शहरातील होत असलेल्या घरफोड्या रोखण्याकरिता पोलीस हतबल झाले होते. या चोराला पकडण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी कंबर कसली. शेवटी पोलिसांना यश झाले. चौकशीमध्ये त्याने ज्याच्या घरफोड्या केल्या त्याची कबुली देऊन चोरीतील अंदाजे ४00 ग्रॅम सोने शहरातील सराफा लाइनमधील एका ज्वेलर्सचे मालक सुजित भाऊलाल साहुजी यांना वेळोवेळी विकल्याचे सांगितले. त्यावरून या प्रकरणाचा तपास करणारे पो. उपनिरीक्षक जे.एम. परदेसी यांनी त्यांच्या सहकार्‍यांनी सोबत घेऊन त्या चोरट्यास शहरात आणले असता चोरट्याने सदर दुकान दाखविले. यावेळी ज्वेलर्सने काही सोने घेतल्याचे कबूल केले; मात्र चोरट्याने प्रत्येक वेळी बिना बट्याचे सोने आणून दागिने नेले व त्यानंतर तेच दागिने मला विकले असे सांगितले. यावरून तपास अधिकार्‍यांनी या प्रकरणात दुकान मालकास समजपत्र देऊन जालना सदर बाजार पोलीस स्टेशन तपास कामी उपस्थित राहण्याचे कळविले. दरम्यान, पोलिसांनी सदर व्यापार्‍याकडून १४ तोळे सोने ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे शहरातील सराफा लाइनमध्ये खळबळ उडाली होती तर अफवांचे पेवच फुटले होते.