नीलेश जोशी /खामगाव: सहकार क्षेत्राचा कारभार पारदर्शक व गुणात्मक व्हावा, यासाठी ही मोहीम प्रकर्षाने राबविण्यात येत असून, सहकार क्षेत्राबाबत धोरणात्मक निर्णय घेणे सोपे व्हावे, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत ्असलेल्या १५६0 सहकारी संस्था सहकार विभागाच्या रडारवर होत्या. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २0१५ या तीन महिन्यात जिल्ह्यातील या संस्थांचे प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षण सहकार विभागाने हाती घेतले होते. ते आता जवळपास पूर्ण झाले आहे. ज्या संस्थांच्या कामकाजाबाबत सहकार विभाग समाधानी नाही, अशा संस्था थेट अवसायनात काढण्यासंदर्भातील ह्यडी रजिस्ट्रेशनह्णची प्रक्रिया आता हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी ह्यलोकमतह्ण ला दिली. सहकार आयुक्त व निबंधक चंद्रकांत दळवी यांनी १७ जून २0१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ही मोहीम हाती घेतली होती. सहकारी संस्थांचे प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षण ३0 सप्टेंबरला पूर्ण झाले. राज्यात २0१३ मध्ये सहकार विभागांतर्गत येणार्या सर्व संस्थांची नोंदणी करण्यासोबतच त्यांचे ताळेबंद थेट ऑनलाइन ठेवण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. या मोहिमेला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जून २0१४ पर्यंंत या मोहिमेला मुदतवाढ दिली होती. तरीही राज्यातील २ लाख ३0 हजार २९५ सहकारी संस्थांपैकी जवळपास ४0 टक्के संस्था या कागदोपत्री असल्याची शंका होती. त्या अनुषंगाने १७ जून २0१५ रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हय़ातील १५६0 नोंदणीकृत सहकारी संस्थांचे सर्वेक्षण झाले. जिल्हा उपनिबंधक सहायक निबंधकांच्या चमूने नोंदणीकृत संस्थांची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या संस्था पूर्णपणे बंद आहेत किंवा त्यापैकी काही सुरू करता येतील काय, याची चाचपणीही यात करण्यात आली होती.
१३२ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द
By admin | Updated: December 16, 2015 01:48 IST