शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

१२६५ पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची ...

बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे़ या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत. वितरित झालेल्या पुस्तकांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे़ त्यामुळे इतर पालकांनीही पुस्तके परत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़

पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत राज्याच्या झालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची जपणूक योग्यरितीने करतात. त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी फेरवाटप करणे शक्‍य होते. शिवाय पुनर्वापरामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होते. हा उद्देश ठेवून शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शाळा व गटसाधन केंद्राच्या वतीने कार्यवाही सुरू आहे.

कागदाच्या बचतीतून हाेणार झाडांचे संवर्धन

बुलडाणा जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रात वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी २० टक्के जमा करून वापरण्याचे नियाेजन आहे़ शासनाचे तसे आदेशही आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जि.प., न.प. व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण २ लाख ७६ हजार ८९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत.

पुढील वर्षासाठी २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर हाेणार आहे़ तसेच २ लाख ६१ हजार ४३६ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे़. शाळा बंद असल्याने पुस्तके परत घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे़

पालक म्हणतात

गेल्या वर्षभरापासून शाळा बंदच आहेत़ त्यामुळे पाठ्यपुस्तके परत करता आली नाही़ शाळा सुरू झाल्यानंतर सर्वच पुस्तके परत करू़ तसेच इतर पालकांनीही पुस्तके परत करण्याची गरज आहे़

गाैतम इंगळे, पालक

शासनाने पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा घेतलेला निर्णय याेग्य आहे़ या निर्णयाचे स्वागतच आहे़ शाळा बंद असल्याने पुस्तके परत करता आली नाहीत़ शाळा सुरू झाल्यानंतर पुस्तके परत करु़

अमाेल पहुरकर, पालक

शासनाने २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयानुसार शिक्षकांना पुस्तके परत घेण्याच्या सूचना केल्या आहेत़ आतापर्यंत १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत़ इतर पालकांनीही पुस्तके परत करण्याची गरज आहे़ शाळा बंद असल्याने पुस्तके जमा करुन घेण्यात अडचणी येत आहेत़

सचिन जगताप, प्रभारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प़ बुलडाणा