शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विहीर अधिग्रहणाचे १.२५ कोटी थकले!

By admin | Updated: March 7, 2016 02:30 IST

शेतकरी अडचणीत; पाणीटंचाईत निधीची टंचाई.

बुलडाणा : जिल्ह्यात मागील वर्षी निर्माण झालेल्या पाणीटंचाईत नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २६९ गावांतील शेतकर्‍यांच्या ३३६ विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने १ कोटी ९१ लाख ५0 हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी फक्त ७१ लाख रुपये मिळाले आहेत. तर एक वर्षापासून शासनाकडे १ कोटी २0 लाख ५0 हजार रुपये थकीत आहेत. त्यातच यंदा ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. त्यामुळे पाणीटंचाईतच निधीची टंचाई निर्माण झाल्यामुळे प्रशासनासह शेतकरी अडचणीत आहेत. यावर्षीही पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली असल्यामुळे सिंचन व पाणीपुरवठा करणार्‍या प्रकल्पात जेमतेम ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर अनेक लघू प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटक जाणवू लागले आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात पाचशेहून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागिरकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने टँकर, विहिरी अधिग्रहण, हातपंप दुरुस्ती, विशेष पाइपलाइन यासह अनेक उपाययोजना करून तहानलेल्या नागरिकांची तहान भागविली होती. तसेच पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने जिल्ह्यातील २६९ गावांतील शेतकर्‍यांच्या ३३६ विहिरी ४00 रुपये दिवस या प्रमाणे अधिग्रहीत केल्या होत्या. बुलडाणा तालुक्यात २0 गावांत २३ विहिरी, चिखली ४३ गावांत ४४ विहिरी, देऊळगाव राजा १८ गावांत २२ विहिरी, मेहकर ३३ गावांत ३३ विहिरी, लोणार २९ गावांत ३६ विहिरी, सिंदखेड राजा ४९ गावांत ८८ विहिरी, खामगाव सहा गावात सहा विहिरी, शेगाव सात गावांत आठ विहिरी, जळगाव जामोद १३ गावांत १३ विहिरी, संग्रामपूर २५ गावांत ३४ विहिरी, मलकापूर तीन गावात तीन विहिरी व मोताळा तालुक्यातील तीन गावांतील शेतकर्‍यांच्या तीन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. यासाठी प्रशासनाने १ कोटी ९१ लाख ५0 हजार १६७ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी शासनाने फक्त डिसेंबरअखेर ७१ लाख रुपये देऊन जिल्ह्याची बोळवण केली. तर अद्यापही शासनाकडे विहीर अधिग्रहणाचे १ कोटी २0 लाख रुपये थकीत आहेत. त्यातच ऐन हिवाळयात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यंदा प्रशासनाने ८४५ गावांत संभाव्य पाणीटंचाई जाहीर केली आहे. अशा कठीण परिस्थितीत अधिग्रहीत विहिरीचे पैसे मिळतील, या आशेने शेतकरी पंचायत समितीत जात आहेत. परंतु, शासनाकडून निधीच आला नसल्याचे सांगून त्यांना आल्या पावली परत यावे लागत आहे. त्यातच आतापासून काही गावात टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाची कसरत होणार आहे.