शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तीन जिल्ह्यात १२१ घरकूले

By admin | Updated: September 3, 2014 00:24 IST

राजीव गांधी घरकूल योजनेमध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश; क वर्ग परिषदाना १२१ घरकूले मिळणार.

अमोल जायभाये / खामगावराजीव गांधी घरकूल योजनेमध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश केल्या नंतर राज्य शासनाने त्यामध्ये २0 कोटीचा निधी क वर्ग नगरपरिषदांसाठी राखीव ठेवला आहे. त्यामध्ये बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्यातील क वर्ग परिषदाना १२१ घरकूले मिळणार आहेत. राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे नामकरन करुन ही योजना राजीव गांधी घरकूल योजना असे करतानाच त्यामध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे तीन जिल्यात १२१ घरकूले मिळणार आहेत. या योजनेतील १ कोटी ७८ लाख ८ हजार ७५0 रु. तीन जिल्यांना मिळणार आहेत. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना या ग्रामीण भागात राबवण्यात येतात. मात्र शहरीभागातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. नव्याने नागरीकरणामध्ये समावेश झालेला संपुर्ण भाग पुढारलेला या विकसीत नाही. यामुळे राज्य शासनाने या भागातील द्रारिद्रय रेषेखालील नागरिकांना या योजनेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर रोजगारासाठी स्थलांतर करुन क वर्ग नगरपरिषदामध्ये आलेल्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी राज्य शासनाने प्रत्येक घरकूला साठी क वर्गनगरपरिषदांना अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. या नविन वाढीनुसार प्रतिघरकूल १ लाख ३८ हजार ७५0 रु. असणार आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा ११ हजार २५0 असणार आहे. *राजीव गांधी घरकूल योजने अंतर्गत सन २0१४-१५ मध्ये राज्यातील संपुर्ण क वर्ग नगर परिषदांमध्ये १४४१ घरकू ले बांधण्याचे उद्दीष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. या अंतर्गत यासाठी १९ कोटी ९९ लाख ३८ हजार ७५0 रु. निधी खर्च करण्यात येणार आहे.