शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:50 IST

चिखली: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दुकानातून व दुकान मालकाच्या गोडावूनमधून बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विकताना दुकान मालकासह एका इसमाविरोधात अन्न-औषध व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून १२ लाख ५ हजार ७४0 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू व मुद्देमाल जप्त  केला आहे.

ठळक मुद्देअन्न, औषध, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई३ ते ४ तास चालली गुटखा जप्तीची कारवाई गुटखा विक्रीचे केंद्र बनलेल्या चिखलीतील गुटखा माफियांचे धाबे दणाणले 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दुकानातून व दुकान मालकाच्या गोडावूनमधून बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विकताना दुकान मालकासह एका इसमाविरोधात अन्न-औषध व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून १२ लाख ५ हजार ७४0 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू व मुद्देमाल जप्त  केला आहे.स्थानिक बाबू लॉजजवळील रईस र्जदा या दुकानातून बंदी असलेला गुटका व सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने अन्न व सुरक्षा अधिकारी माहुरे यांनी आपल्या सहकार्‍यांसह चिखली ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रईस र्जदा या दुकानाची झाडाझडती घेऊन मालक रईस कुरेशी (वय ३२) याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून दुकानापासून जवळ असलेल्या त्याच्यात गोडावूनमध्ये असलेला गुटका व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतला. त्यावेळी तिथे अजीम खा उस्मान खा (वय ३७) याला ताब्यात घेतले. या कारवाईत जप्त केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू आणि इतर मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख ५ हजार ७४0 रुपये असून, जप्त केलेला मुद्देमाल बुलडाणा येथील मुख्य कार्यालयात नेण्यात आला असून, पुढील कारवाई सुरूआहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे, संतोष सुरोशिया, किशोर साळुंके, कर्मचारी श्रीकांत मोरे, समाधान जाधव, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद देशमुख, उपनिरीक्षक गवारगुरू, राजू सोनुने, शोगोकर, यांच्यासह महिला कर्मचार्‍यांचा समावेश होता.  गुटखा जप्तीची ही कारवाई सुमारे ३ ते ४ तास चालली. या कारवाईने प्रतिबंधित गुटखा विक्रीचे केंद्र बनलेल्या चिखलीतील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.