बुलडाणा : ग्रामसेवक युनियनची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षेत असलेली पदोन्नतीची मागणी राज्य शासनाने मंजूर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सभेत जिल्ह्यातील १२ कर्मचार्यांना पदोन्नती दिल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये ग्रमाविकास अधिकार्यांमधून दोघांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली तर १0 ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नतीच्या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्ही. आर. चव्हाण, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी पाठपुरावा केला.
१२ ग्रामसेवकांना मिळाली पदोन्नती
By admin | Updated: August 13, 2014 23:40 IST