बुलडाणा : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी ११६ व्यक्तींनी १८६ अर्ज नेले. यापैकी ४१ नामांकन आज दाखल करण्यात आले. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्याच्या कार्यालयावर एकच गर्दी होणार आहे.२0 सप्टेबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासा प्रारंभ झाला. पितृपक्ष संपेपर्यंत केवळ तीन उमेदवारांनी नामांन दाखल केले होते. २३ सप्टेबरला पितृपक्षाची सांगता होताच नामांकन दाखल करण्यार्या उमेदवारांची गर्दी वाढली होती. उद्या २७ सप्टेबर रोजी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. २६ सप्टेबरला बुलडाणा मतदार संघातून १९ व्यक्तींनी ३४ अर्ज नेले. येथे ८ व्यक्तींनी नामांकन दाखल केले. खामगाव मध्ये १३ व्यक्तींनी १८ अर्ज नेले. येथे ८ नामांन दाखल केले. मेहकरमध्ये २२ व्यक्तींनी २२ अर्ज नेले येथे ९ नामांकन दाखल झाले, सिंदखेडराजा येथे २0 व्यक्तींनी ४७ अर्ज नेले येथे ४ नामांकन दाखल झाले. मलकापूर येथे ६ व्यक्तींनी ७ अर्ज नेले. येथे ६ व्यक्तींनी नामांकन दाखल केले.चिखलीत १0 व्यक्तींनी २२ अर्ज नेले. बुलडाण्यात मनसेचे संजय गायकवाड, बसपाचे शंकर चौधरी, भारीप बमंसचे अजहर खान सिकंदरखान तर अपक्ष म्हणुन प्रमोद कळसकार, अशोक शिंदे, दादाराव गायकवाड ,नामदेव डोंगरदिवे यांनी अर्ज दाखल केला. खामगाव मध्ये काँग्रेसकडून आ. दिलीपकुमार सानंद, भारीप-बमसंकडून अशोक सोनोने तर भाज पकडून अमोल अंधारे, एमडीपीकडून मो.हसन मो.खलीक यांनी अर्ज भरले. जळगाव जामोद म तदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतिने रामविजय बुरूंगले, सौ.मिनाक्षी बुरूंगले, मनसेचे गजानन वाघ, स पाकडून करीम खॉ समर खॉ, अपक्ष म्हणून श्रीकृष्ण कुरवाडे यांनी अर्ज दाखल केले. सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये सेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर, भाजपाचे डॉ.गणेश मांटे, मनसेचे विनोद वाघ, राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर मेहकर मध्ये सेनेचे डॉ.संजय रायमुलकर, भारीपचे प्रकाश गवई, विठ्ठल ढाकरके गजानन लांडगे, सुनिल डोंगरदिवे, डिगांबर डोंगरे,सतिष ताजने, रमेश थोरात, गुलाबराव अवसरमोल यांनी तर मलकापूर मध्ये भाजपकडून चैनसुख संचेती,भारिप बमसं कडून वसंतराव दांडगे, शिवसेनेकडून वसंतराव भोजने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले
११६ व्यक्तींनी नेले १८६ अर्ज
By admin | Updated: September 27, 2014 00:08 IST