शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

११४ विनाअनुदानित शाळा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:21 IST

१५ वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिकचे शिक्षक वेतनाविना

बुलडाणा : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शिक्षकांचा विनावेतन काम करण्याचा प्रवास संपावा व त्यांना वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने आंदोलन पुकारून १८ जुलै रोजी जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा १०० टक्के बंद ठेवण्यात आल्या. राज्यातील २२ हजार ५०० विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षिका बिनपगारी काम करत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेप्रमाणे उच्च माध्यमिक शाळांचे आॅनलाइन मूल्यांकन २०१४ मध्येच शासनाने केले आहे, तसेच १६ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे असतानासुद्धा प्रत्यक्ष अनुदान देऊन पगार चालू करणे तर दुरच; मात्र अद्यापही अनुदान पात्र उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शासनाने जाहीर केली नाही. यासंदर्भात आतापर्यंत कृती समितीच्यावतीने राज्याध्यक्ष प्रा.तानाजी नाईक यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली सनदशीर मार्गाने जवळपास २०० आंदोलने करण्यात आली आहेत; मात्र त्याच्या या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. २४ जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने निर्णय घेऊन राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेच्या, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पात्र याद्या घोषित करून त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने राज्यभर विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून शिक्षकांनी या आंदोलनात १०० टक्के प्रतिसाद दर्शवला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे धरणे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने राज्यभर विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी १८ जुलै रोजी धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपल्या शाळा बंद ठेवून आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन निकम, उपाध्यक्ष प्रा.अमोल डुकरे, सचिव प्रा.सुखदेव सरदार, मनोरमा राठोड तथा विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक आज ना उद्या पगार मिळेल, या आशेवर गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन अध्यापनाचे, ज्ञानदानाचे कार्य करत आहेत; मात्र शासनाचे याकडे दुर्लक्षच होत असल्याने विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद ठेवून आंदोलन पुकारावे लागले. - प्रा.गजानन निकम, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती, बुलडाणा.