जिल्ह्यात ३६ हजार ११८ नवीन वाहनांची नोंदणी४५ हजार ११७ नवीन चालक परवानेबुलडाणा : सन २०१६-१७ या आर्थकि वर्षात बुलडाणा परिवहन कार्यालयानेधडाकेबाज कामगिरी करीत महसूल वसूलीच्या उद्दिष्टापैकी तब्बल १११.७२ टक्केवसूली केली आहे. त्यामुळे शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा यांना शासनाने गत आर्थिक वर्षात४०.२५ कोटी महसूल उद्दिष्ट दिले होते. त्यातुलनेत विभागाने ४४.९७ कोटीम्हणजेच १११.७२ टक्के महसूलाची वसूली केली आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ३६ हजार ११८ नविनवाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३१ हजार २७९ दुचाकी, १८२८चारचाकी कार व जिप, १२ आॅटोरीक्षा, १८१ ट्रक, १११२ डिलीव्हरी व्हॅन्स,१६८४ ट्रॅक्टर व ८१९ प्रवासी वाहनांचा समावेश आहे. तसेच या वर्षात ४५हजार ११७ नविन ड्रायव्हींग लायसन्स, १८५२ नविन वाहक परवाना परिवहनविभागाने जारी केले आहे. जिल्ह्याकरिता एक वायुवेग पथक मंजूर करण्यात आले असून सन २०१६-१७ मध्येजिल्ह्यातील एकूण ३४८३ वाहनांविरूद्ध धोकादायकरित्या वाहन चालविणे,हेल्मेट न वापरणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेटलावणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, विना परवानावाहन चालविणे, कराचा भरणा न करणे आदी विविध गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यातयेवून १ कोटी ४१ लाख ६५ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला. तसेच १ कोटी ४१लाख ७२ हजार इतकी कर वसूली करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी ७३व्यक्तींच्या चालक परवानावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक आदी परवाना धारक वाहन मालकांकडून या वर्षात७९ लक्ष २५ हजार ८३ रूपयांचा व्यवसाय करही वसूल करण्यात आला आहे.कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सामुहिक सहभागातून वप्रयत्नांमधून कार्यालयाने उद्दिष्टपूतीर्पेक्षा जास्त महसूल वसूली साध्यकेली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाडयांनी दिली आहे.
बुलडाणा परिवहन कार्यालयाची १११.७२ टक्के महसूल वसूली
By admin | Updated: April 12, 2017 13:41 IST