शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरी करणारी ११ वाहने ताब्यात

By admin | Updated: April 8, 2017 00:27 IST

शेगाव तहसीलदारांची धडक कारवाई : १ लाख ७० हजार रुपयांचा दंड

शेगाव: शेगाव तालुक्यातील हरासी न झालेल्या रेतीघाटांवर जाऊन रेतीची चोरी करणाऱ्या रेतीमाफियांविरुद्ध शुक्रवारी तहसीलदार गणेश पवार यांनी धडक मोहीम राबविली. या मोहिमेत सायंकाळपर्यंत ११ वाहने ताब्यात घेण्यात आली असून या वाहनधारकांना १ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.शेगाव तालुक्यातील अनेक भागातील रेतीघाट तांत्रिक कारणांमुळे हरास झाले नाहीत. यामुळे रेती चोरट्यांनी या रेतीघाटांवरून वाहनांद्वारे रेती चोरण्याचा सपाटा लावला होता. याबाबतची तक्रार तहसीलदार गणेश पवार यांना प्राप्त होताच त्यांनी शुक्रवारी एक विशेष पथक तयार करून सकाळपासून डोंगरखेड व इतर रेती घाटांवर धाडी टाकल्या. यामध्ये टाटा ४०७ क्रमांक एमएच ३७-५३६४ मालक हरिदास अरबट, एमएच २८ बी ३१७३ मालक नारायण मारोती जमाव, एमएच २८ बी ९५०८ शे. जमीर शे. बशीर रा. कवठळ, एमएच १४ एझेड ०१०८ मालक शे. सरवरखा, एमएच ३० एव्ही ०७५१ मालक राजेश जगदेव खडे, एमएच ३० जे ९१४२ रितेश अग्रवाल, एमएच ३० एबी ९६३७ मालक गणेश सपकाळ, एमएच ३० ए आर ५८२५ सचिन पांडे, एमएच ३० जे ७०३२ मंगेश ठाकरे, एचएच ३० सीएच ०८३२ पांडुरंग तुंबडे, एमएच ३० जे ५८७० सुभाष ठाकरे अशा एकूण ११ वाहनांना ताब्यात घेण्यात आले. या वाहनांमधील बहुतांश वाहने ही अकोला जिल्ह्यातील असल्याचे समजते. तहसीलदार गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये मंडळ अधिकारी आर.बी. दीक्षित, तलाठी के.के. तायडे, ए.जी. डाबेराव, एन.बी. जाधव आणि कोतवाल प्रवीण तायडे यांनी ही कारवाई पूर्ण केली. जप्त करण्यात आलेली वाहने शेगावच्या तहसील कार्यालयात लावण्यात आली असून या ११ वाहनांवर १ लाख ६९ हजार ४०० रुपये दंड ठोठावण्यात आला. रेती चोरट्यांविरुद्ध कारवाईला आणखी गती देण्यात येणार असून आता वाहनचालकांसह वाहन मालकांविरुद्धही कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.